लाईफस्टाईलऑफिसमध्ये खुर्चीवर बसण्याच्या स्टाइलवरून व्यक्तीचा स्वभाव कळतो; जाणून घ्या सविस्तर

ऑफिसमध्ये खुर्चीवर बसण्याच्या स्टाइलवरून व्यक्तीचा स्वभाव कळतो; जाणून घ्या सविस्तर

spot_img
spot_img

ज्योतिषी तळहातावरील रेषा वाचून आपले भविष्य वर्तवतात. त्यांच्यासोबत काय चांगल्या किंवा वाईट गोष्टी घडतील याचा अंदाज ते बांधतात. मात्र समुद्रशास्त्रानुसार माणसाचे वर्तन, त्याची उठण्याची-बसण्याची पद्धत, शारीरिक स्वरूप अशा अनेक गोष्टी त्याच्याविषयी सांगता येतात.

सामुद्रिक शास्त्राचे तज्ञ खुर्चीवर बसण्याच्या पद्धतीवरून माणसाच्या स्वभावाची माहिती देतात. हे आपल्याला आपल्या कार्यालयात काम करणार्या सहकाऱ्यांचे व्यक्तिमत्व समजून घेण्यास मदत करू शकते.

१. खुर्चीवर बसताना काही जण गुडघे जवळ ठेवतात आणि पायाच्या तळव्यांमध्ये खूप अंतर ठेवतात. असे म्हटले जाते की या लोकांमध्ये जबाबदारीचे भान फारच कमी असते. आकर्षक व्यक्तिमत्त्व आणि स्पष्टता असूनही हे लोक कठीणप्रसंगी सर्वप्रथम माघार घेतात.

२. याउलट पाय वरून थोडेसे खुले आणि घोटे जवळ ठेवून बसणारे लोक आरामदायी जीवन जगणे पसंत करतात. असे काही लोक मेहनत करून त्यांची मने जिंकतात. पण त्यांची एकाग्रता खूप लवकर बिघडते, त्यांचे मन नेहमी इतरत्र भटकत राहते. अशा लोकांना विनाकारण समस्यांना सामोरे जाणे आवडत नाही.

३. आपण अनेकांना पायावर पाय ठेवून किंवा पाय एकमेकांवर क्रॉस घेऊन बसलेले पाहिले असेल. सामुद्रिक शास्त्रानुसार असे लोक खूप सर्जनशील असतात. ते स्वभावाने थोडे लाजाळू आणि नम्र असतात. ते अतिशय आनंदी जीवन जगतात. जगासमोर लाज वाटेल अशा गोष्टी करणं ते टाळतात.

४. जे लोक खुर्चीवर बसताना गुडघ्यापासून घोट्यापर्यंत पाय सरळ ठेवतात आणि कंबर नेहमी सरळ असते, ते शिस्तबद्ध असतात. हे लोक अतिशय वक्तशीर आणि आत्मपरीक्षण करणारे असतात. या लोकांना कोणत्याही कामात १०० टक्के योगदान देणे आवडते. बेजबाबदार लोकांचा सहवास त्यांना आवडत नाही. असभ्य वर्तन त्यांना सहन होत नाही. अशा व्यक्ती जीवनात बरीच प्रगती करतात.

५. जे लोक पाय एकत्र ठेवून खुर्ची थोडी तिरकस ठेवून काम करतात त्यांना थोडे जिद्दी मानले जाते. पण ते खूप महत्त्वाकांक्षी असतात. अशी माणसं जेव्हा एखाद्या कामात गुंतलेली असतात, तेव्हा ते काम पूर्ण करूनच थांबतात. त्यामुळे त्यांना यश मिळण्याची शक्यता अधिक असते.

लेटेस्ट न्यूज़

जाहिरात