Ola S1 Pro Electric Scooter Finance Options: ओला इलेक्ट्रिकने इलेक्ट्रिक टू-व्हीलर सेगमेंटमध्ये आपले स्थान टिकवून असून अनेक महिन्यांपासून ती भारतात नंबर वन इलेक्ट्रिक स्कूटर आहे. विशेषबाब म्हणजे ओलाने ग्राहकांच्या गरजेनुसार बजेट आणि मिड-रेंज तसेच प्रीमियम सेगमेंटमध्ये चांगली उत्पादने बाजारात आणली आहेत. ओला एस 1 सीरिजच्या इलेक्ट्रिक स्कूटरची एक्स शोरूम किंमत 89,999 रुपयांपासून सुरू होते आणि 1.47 लाख रुपयांपर्यंत जाते. मात्र, त्यासाठी फायनान्स करायचे असेल, तर ते अगदी सोपे व जलद आहे. ह्या दिवाळीत केवळ २५००० रुपयांचे डाउन पेमेंट करून तुम्ही ही ओला ची इलेक्ट्रिक स्कूटर घरी आणू शकता.
जबरदस्त रेंज आणि वेगवान स्पीड
सगळ्यात आधी आम्ही तुम्हाला ओला एस 1 प्रो (Ola s1 Pro) सीरिजबद्दल सांगतो, याच्या पहिल्या जनरेशन मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 1.40 लाख रुपये आणि सेकंड जनरेशन मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 1.47 लाख रुपये आहे. ओला एस 1 प्रोच्या जनरेशन 2 मॉडेलची रेंज सिंगल चार्जवर १९५ किलोमीटर पर्यंत आहे. तर टॉप स्पीड २० किलोमीटर प्रति तास आहे. एस 1 प्रोच्या पहिल्या जनरेशन मॉडेलची बॅटरी रेंज 181 किलोमीटरपर्यंत आणि टॉप स्पीड 116 किलोमीटर प्रति तास आहे. ही प्रीमियम इलेक्ट्रिक स्कूटर लूक आणि फीचर्समध्येही जबरदस्त आहे.
Ola S1 Pro Gen 1 Down Payment & Loan EMI Details
ओला एस 1 प्रो जनरेशन 1 मॉडेलची किंमत 1,39,999 रुपये आणि ऑन-रोड किंमत 1,48,758 रुपये (दिल्ली) आहे. जर तुम्ही २५००० रुपये डाउन पेमेंट करून ही जबरदस्त इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी नेली तर तुम्हाला 1,23,758 रुपयांचे कर्ज घ्यावे लागेल. जर कर्जाचा कालावधी ३ वर्षापर्यंतचा असेल आणि व्याजदर ९ टक्के असेल तर तुम्हाला पुढील ३६ महिन्यांच्या कालावधीसाठी ३.९३५ रुपये मासिक हप्ता म्हणजेच ईएमआय भरावा लागेल. पहिल्या जनरेशनच्या ओला एस 1 प्रोला वरच्या अटींनुसार फायनान्स केल्यास सुमारे १८००० रुपयांचे व्याज लागेल.
Ola S1 Pro Gen 2 Down Payment & Loan EMI Details
ओला एस1 प्रो सेकंड जनरेशन मॉडेलची किंमत १,४७,४९९ रुपये आणि ऑन-रोड किंमत १,५६,३९१ रुपये आहे. जर तुम्हाला या प्रीमियम इलेक्ट्रिक स्कूटरला २५,००० रुपयांच्या डाउन पेमेंटसह फायनान्स करायचे असेल तर तुम्हाला १,३१,३९१ रुपयांचे कर्ज घ्यावे लागेल. जर तुम्ही ९ टक्के व्याजदराने 3 वर्षांसाठी कर्ज घेत असाल तर पुढील तीन वर्षांसाठी दरमहा ४,१७८ रुपये मासिक हप्ता भरावा लागेल. ओला एस 1 प्रोच्या दुसऱ्या जनरेशनसाठी १९,००० रुपयांपेक्षा जास्त व्याज खर्च येणार आहे.
Disclaimer: ओला एस 1 प्रो इलेक्ट्रिक स्कूटरला फायनान्स करण्यापूर्वी, आपण आपल्या जवळच्या ओला शोरूममध्ये जाणे आवश्यक आहे आणि फायनान्स तपशील तपासणे आवश्यक आहे, जेथे आपल्याला काही फरक दिसू शकतो.