आर्थिकटाटा कंपनीच्या या शेअर्सने 1 लाखांचे केले 12 कोटी रुपये, सोबत जबरदस्त...

टाटा कंपनीच्या या शेअर्सने 1 लाखांचे केले 12 कोटी रुपये, सोबत जबरदस्त बोनस देखील

spot_img
spot_img

टाटा समूहातील एका कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांचे नशीब उज्ज्वल केले आहे. ती टायटन कंपनी आहे. गेल्या १४ वर्षांत टायटनचा शेअर ४० रुपयांवरून २४०० रुपयांपर्यंत वाढला आहे.

टायटनने आपल्या गुंतवणूकदारांना या काळात बोनस शेअर आणि स्टॉक स्प्लिटचा फायदा ही दिला आहे. याशिवाय टायटन सातत्याने आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश देत आहे.

१ लाखांचे झाले १२ कोटी
२० फेब्रुवारी २००९ रोजी मुंबई शेअर बाजारात टायटन कंपनीचा शेअर ३८.२० रुपयांवर होता. जर एखाद्या व्यक्तीने २० फेब्रुवारी २००९ रोजी टायटनच्या शेअर्समध्ये १ लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर त्याला सुमारे २६०० शेअर्स मिळाले असते. कंपनीने जून २०११ मध्ये १:१ या प्रमाणात बोनस शेअर्स दिले आहेत. बोनस शेअर मिळाल्यानंतर शेअर्सची संख्या ५२०० होईल. टायटनने शेअरची १:१० या प्रमाणात विभागणी केली आहे. म्हणजे गुंतवणूकदारांकडे एकूण ५२००० शेअर्स असतील. टायटनचा शेअर १० फेब्रुवारी २०२३ रोजी बीएसईवर २४६८ रुपयांवर बंद झाला. अशा परिस्थितीत २० फेब्रुवारी २००९ रोजी टायटनच्या शेअर्समध्ये गुंतवलेल्या १ लाख रुपयांचे मूल्य सध्या १२.८ कोटी रुपये झाले असते.

१० वर्षांपूर्वी १ लाख लावले असते तर ते आता ९ लाखांपेक्षा जास्त झाले असते
टायटन कंपनीच्या शेअर्सने गेल्या १० वर्षातही जबरदस्त परतावा दिला आहे. २२ फेब्रुवारी २०१३ रोजी टायटन कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर रु. २५५.६५ वर व्यवहार करत होते. कंपनीचे शेअर्स १० फेब्रुवारी २०२३ रोजी BSE वर Rs.२४६८ वर बंद झाले आहेत. जर एखाद्या व्यक्तीने सुमारे १० वर्षांपूर्वी टायटनच्या शेअर्समध्ये १ लाख रुपये गुंतवले असतील आणि त्याची गुंतवणूक कायम ठेवली असती, तर सध्या या पैशाची किंमत ९.६५ लाख रुपये झाली असती. टायटनच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची उच्च पातळी २७९० रुपये आहे. तर नीचांकी पातळी १८२७.१५ रुपये आहे.

डिस्क्लेमर : येथे केवळ स्टॉकच्या परफॉर्मेंस बद्दल माहिती दिली आहे, हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते आणि गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या सल्लागाराचा सल्ला घ्यावा.

लेटेस्ट न्यूज़

जाहिरात