अहमदनगर बातम्याअहमदनगर मध्ये टायर फुटल्याने कंटेनर थेट दुकानात घुसला

अहमदनगर मध्ये टायर फुटल्याने कंटेनर थेट दुकानात घुसला

spot_img
spot_img

टायर फुटल्याने कंटेनर थेट दुकानात घुसल्याच्या थरार अहमदनगर जिल्ह्यात घडला आहे. जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात तिसगावमध्ये सदर घटना घडली. या घटनेनंतर बराच काळ गोंधळ उडाला होता. ही घटना मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान घडली.

अधिक माहिती अशी की, तिसगावमध्ये वृद्धेश्वर चौकात नागरिकांची वर्दळ होती. त्याच वेळेला सायंकाळी शेवगावकडून नगरकडे एक कंटेनर चालेल होता. परंतु चौकात अचानक कंटेनरचा टायर फुटला. त्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटले. कंटेनर थेट दुकानाकडे घुसला.

या घटनेमुळे दुकानाजवळ उभे असलेले मच्छिंद्र पाथरे (रा.तिसगाव) हे किरकोळ जखमी झाले आहेत. टायर फुटल्यानंतर कंटेनर दुकानाच्या दिशेने येत असल्याचे लक्षात येताच दिलीप जनरल स्टोअर या दुकानाजवळील ग्राहक सैरावैरा पळू लागले. काही काल गोंधळ उडाला. दरम्यान यात काही मोटरसायकलीचे नुकसान झाल्याचेही वृत्त आहे.

दरम्यान या घटनेवेळी मोठा आवाज झाला होता. त्यामुळे अनेकांनी येथे धाव घेतली. काही काळं बघ्याची गर्दी जमली होती. दरम्यान तरुणांनी प्रसंगावधान राखत कंटेनर चालकाला खाली उतरून घेत सुरक्षित ठिकाणी हलवले. परंतु या घटनेनंतर काही काळं परिसरात चांगलाच गोंधळ उडाला होता. येथील गर्दी कमी करावी, अतिक्रमणे काढावीत अशी मागणी नागरिकांमधून होऊ लागली आहे.

लेटेस्ट न्यूज़

जाहिरात