अभिनेत्री राखी सावंतला Actress Rakhi Sawant ओळखत नाही असा क्वचितच सापडेल. दरम्यान तिच्या संदर्भात मोठी बातमी आली आहे. तिला अटक करण्यात आल्याचे वृत्त आले आहे. अंबोली पोलिसांनी तिला अटक केल्याचे समजते.
अभिनेत्री आणि मॉडेल शर्लिन चोप्राने ट्विट करत याविषयीची माहिती दिली. या ट्विटमध्ये शर्लिनने एफआयआरविषयीही माहिती दिली आहे. शर्लिनच्या तक्रारीनंतरच अंबोली पोलिसांनी राखीला अटक केल्याची माहिती समोर येत आहे. एका मॉडेलचा प्रायव्हेट व्हिडीओ व्हायरल केल्याच्या आरोपाखाली राखीला अटक झाली आहे.
कोण आहे शर्लिन चोप्रा?
शर्लिन चोप्रा ही अभिनेत्री आणि मॉडेल आहे. तिने एमटीव्ही स्पिल्ट्सविलाच्या सहाव्या सिझनमध्ये सूत्रसंचालन देखील केले जोते. त्याचप्रमाणे ती बिग बॉस या शो मध्ये देखील दिसली होती.