अहमदनगर बातम्यासत्यजीत तांबेंच्या विजयानंतर अजितदादांचा मोठा खुलासा, राजकीय धुसफूस वाढली

सत्यजीत तांबेंच्या विजयानंतर अजितदादांचा मोठा खुलासा, राजकीय धुसफूस वाढली

spot_img
spot_img

विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाचा निकाल काल लागला. यामध्ये सत्यजित तांबे यांच्या विजयाने सर्वच समीकरणे बदलली. कारण फॉर्म भरण्यापासूनच त्यांनी धक्कातंत्र वापरले होते. दरम्यान यानंतर महाविकास आघाडीने शुभांगी पाटील यांच्या स्वरूपात मोठा तगडा उमेदवार दिला. परंतु अपक्ष असूनही सत्यजित तांबे विजयी झाले.

यानंतर आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. सत्यजित तांबेंना महाविकास आघाडीतून मदत झाल्याचे दिसते असे ते म्हणाले. म्हणजेच महाविकास आघाडीतील काहींनी सत्यजित तांबेना मदत केल्याचे त्यांनी म्हटले. दरम्यान त्यांच्या या वक्तव्याने काँग्रेसचे नाना पटोले आक्रमक होत अजित दादांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.

अजितदादा काय म्हणाले
सत्यजीत यांना बरीच वर्षे राज्याच्या राजकारणात काम करायचं आहे. त्यामुळे त्यांनी योग्य निर्णय घ्यावा.सत्यजित यांना महाविकास आघाडीतून देखील मते मिळाली आहेत. दरम्यान आता सत्यजीत याना स्वतःच्या मनाचे ऐकण्याचा अधिकार आहे. त्यामुळे त्यांनी माझं ऐकावं नाही ऐकावं हा त्यांचा निर्णय असेल. पण, मला स वाटत की त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये यावं.

काय म्हणाले नाना पटोले
‘राष्ट्रवादीने सत्यजीत तांबे यांना निवडून आणण्यासाठी मदत केल्याचे अजित पवार यांनी वक्तव्य केले. यावरुन राष्ट्रवादीनेही मदत केल्याचा मोठा खुलासा केला आहे, अजित पवार एक जबाबदार व्यक्ती आहेत. तेच असं बोलत असतील तर महाविकास आघाडीची बैठक असेल तेव्हा आम्ही यावर खुलासा करु, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते नाना पटाले यांनी दिली.

लेटेस्ट न्यूज़

जाहिरात