अहमदनगर बातम्याअहमदनगर ब्रेकिंग : छावणी परिषद निवडणुकीस अखेर मुहूर्त मिळाला, या तारखेला मतदान

अहमदनगर ब्रेकिंग : छावणी परिषद निवडणुकीस अखेर मुहूर्त मिळाला, या तारखेला मतदान

spot_img
spot_img

Ahmednagar Cantonment Board : तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कॅन्टोन्मेंट बोर्डच्या निवडणुकीसंदर्भात संरक्षण मंत्रालयाने शुक्रवारी अधिसूचना जारी केली. त्यामुळे अखेर कॅन्टोन्मेंट बोर्डच्या निवडणुकीला सुरुवात झाली आहे. संरक्षण मंत्रालयाने निवडणुकीची तारीख ३० एप्रिल निश्चित केली आहे. अहमदनगर कँटोन्मेंटच्या सात जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. औरंगाबाद कँटोन्मेंट बोर्डची शेवटची निवडणूक जानेवारी २०१५ मध्ये झाली होती. लोकायुक्त सदस्यांचा कार्यकाळ जानेवारी २०२० मध्ये संपला. सध्या कॅन्टोन्मेंट बोर्डवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे.


लष्कराचे ब्रिगेडिअर छावणी परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात, तर लोकनियुक्त सदस्यांमधून उपाध्यक्षांची निवड केली जाते. लोकनियुक्त सदस्य नसल्याने मध्यंतरी अध्यक्ष आणि सीईओ हेच कारभार पाहत होते. ऑक्टोबर २०२१ पासून शासनाने वसंत राठोड यांची नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती केली. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून अध्यक्ष, सीईओ आणि नामनिर्देशित सदस्य अशा तिघा जणांकडून छावणी परिषदेचा कारभार सुरू होता. आता येत्या ३० एप्रिल रोजी छावणी परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत.


भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डामध्ये आतापर्यंत भाजप-शिवसेना युतीचा दबदबा राहिला आहे. आता शिवसेना कोंडीत सापडली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे दोन गट झाले आहेत. आता निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिले आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाची निवडणूक ही दोन्ही गटांसाठी पहिली राजकीय कसोटी ठरणार आहे.

लेटेस्ट न्यूज़

जाहिरात