अहमदनगर बातम्याअहमदनगर सायकलिंग क्लब आयोजित देशातील सर्वात मोठी सायक्लोथॉन म्हणजे "अहमदनगर सायक्लोथॉन"

अहमदनगर सायकलिंग क्लब आयोजित देशातील सर्वात मोठी सायक्लोथॉन म्हणजे “अहमदनगर सायक्लोथॉन”

spot_img
spot_img

अहमदनगर सायकलिंग क्लब आयोजित देशातील सर्वात मोठी सायक्लोथॉन म्हणजे “अहमदनगर सायक्लोथॉन” २४ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी या काळात अहमदनगर शहरात पार पडत आहे. मागील ३ सिझन्स च्या यशस्वी आयोजनानंतर अहमदनगर सायक्लोथॉनचे हे यंदाचे ४थे सिझन आहे. द्वारका लॉन्स, नगर-कल्याण रोड हे या सायक्लोथॉन चे मुख्य केंद्र असून नगर-कल्याण हायवे वरती ही सायक्लोथॉन पार पडेल.

या सायक्लोथॉन मध्ये देशविदेशातील २००० पेक्षा अधिक सायलकलिस्ट व नागरिक सहभागी होतील. कोरोनाच्या संकटामुळे तब्बल दोन वर्षांच्या अंतरानंतर सायक्लोथॉन चे आयोजन होत असले तरी या सिझनला स्पर्धकांचा उत्साह मात्र भरभरून लाभला आहे.या सिझन मधील विशेष आकर्षक म्हणजे देशातील सर्वात मोठा सायक्लोथॉन एक्स्पो या २५ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे.

या सायक्लोथॉन मधील राईड कॅटेगरीज २० किमी, ५० किमी, ७५ किमी आणि १०० किमी आहेत. देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवाचे औचित्य साधत ७५ किमी राईड चे यावर्षी पहिल्यांदाच समावेश करण्यात आला आहे. नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, संगमनेर, शेवगाव, कर्जत, जामखेड कोपरगाव नेवासा या शहरांमध्ये प्रोमो राइड्सचे आयोजन करण्यात आले होते. सायक्लिस्टसचा या राईड्सना जोरदार प्रतिसाद लाभला.


फिटनेस जनजागृती व सायकलिंग कल्चर निर्मितीचा उद्देश्य समोर ठेवत अहमदनगर सायकलिंग क्लब द्वारे २०१८ मध्ये अहमदनगर सायक्लोथॉनची सुरुवात करण्यात आली. काही शेकडो सायकलिस्टच्या सहभागात सुरु झालेली ही सायक्लोथॉन आज जगातील सर्वात मोठी सायक्लोथॉन बनण्याच्या दिशेने पाऊल टाकत आहे. आजपर्यंच्या प्रवासात अहमदनगर सायक्लोथॉनला BMW, Audi, Mini Cooper, Phoenix Marketcity यांचे मुख्य प्रायोजकत्व लाभले आहे. अभिनेत्री मंदिरा बेदी, IPS कृष्ण प्रकाश सिंह यासारख्या अनेक मान्यवरांनी आजपर्यंत सायक्लोथॉनला उपस्थिती लावलेली आहे.


अहमदनगर सायक्लोथॉनला आजपर्यंतच्या सर्व सीझन्सला मिळत असलेला प्रतिसाद पाहता अहमदनगर सायकलिंग क्लब महाराष्ट्रात निमशहरी आणि ग्रामीण भागांमध्ये एक सायकलिंग कल्चर निर्माण करण्यात यशस्वी झाले आहे असे म्हणले तरी वावगे ठरणार नाही.

लेटेस्ट न्यूज़

जाहिरात