सध्या निसर्ग लहरी झाला आहे असे म्हणतात. त्याचा प्रत्यय सध्या येत आहे. भर थंडीच्या ऋतूत अहमदनगर जिल्ह्यात वाडदळासह गारपीट झाली आहे. राहुरी तालुक्यातील वांबोरी परिसरात गारपीट झाली. या गारपिटीमुळं गहू, हरभरा कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.
काल अर्थात मंगळवार (दि.२४) रोजी रात्री आठच्या सुमारास गारपीट झाली.
सुमारे २० ते ३० मिनीट गारांसह मुसळधार पाऊस झाला. या गारपिटीने शेतकरी पुरता हतबल झाला आहे. कारण शेतात निसावून उभा असणारा गहू पुरता भूईसपाट जाला आहे.
आधीच परतीच्या पावसाने या भागातील खरीपाच्या पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. अद्याप त्या नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत असतानाच आता या गारपिटीमुळे शेतकरी हतबल झाला आहे.दरम्यान हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी पुन्हा एकदा पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यांनी वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार, राज्यात 26, 27, 28 जानेवारी रोजी मध्य महाराष्ट्रातील नाशिक समवेतच आजूबाजूच्या जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.त्यामुळे आगामी काही दिवसात महाराष्ट्रातील काही भागांत पाऊस कोसळण्याची शक्यता निर्माण जाळी आहे.
शेतकरी बांधवाना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.