वडिलांच्या निधनानंतर आपलं बस्तान बसवण्यासाठी अजित दादांनी काय केलं? त्यावेळी त्यांची परिस्थिती काय होती? त्यांनी आज आपल्या मेहनतीचे अनेक किस्से जनतेसोबत शेअर केले आहेत. बारामतीत अप्पासाहेब पवार उद्योग भवनाचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
ते म्हणाले, ‘मीही दूध व्यवसायातून पुढे आलो आहे. वडिलांचे निधन झाल्यानंतर मी या व्यवसायाने आलो. माझ्या आयुष्यात असे अनेक किस्से आहेत. जे लोकांना खरे वाटणार नाही, पण एक किस्सा सांगतो. त्यावेळी एक गाय साडेसात हजारांना विकली जात होती आणि एक एकर जमीन साडेसात हजारांना विकत मिळत होती. त्यावेळी जमिनीचा दर कमी होता आणि इतर गोष्टींबद्दल एक वेगळंच कुतूहल होतं.
गायींसाठी पंखे…
बारामतीत पूर्वीपासूनच मोठ्या प्रमाणात शेती आणि दुधाचा व्यवसाय लोक करत होते. त्यावेळी शेतकरी नियमितपणे जनावरांची काळजी घेत होते. अजित पवार म्हणाले, बारामतीच्या आजूबाजूच्या गावातील लोक गायींसाठी पंखे लावायचे. यावरून शेतीत मेहनत घेतली तर यश मिळेल, हे त्या काळी जाननाऱ्या लोकांपैकी एक जण होता. आजच्या गायींना योग्य पोषण मिळत असल्याने त्यांनाही भरपूर धान्य मिळते. गाई-म्हशीही खूप बलवान असतात. या शेतकऱ्यांनी गायीच्या चाऱ्याचा अभ्यास केला आहे. दर १२ तासांनी गाय आणि म्हशीचे दूध काढले जाते. त्यामुळे तब्येत चांगली आहे.
कामात राजकारण नाही..
सत्ता गेल्यानंतर विकासाचा वेग मंदावेल, असे वाटत होते. राजकीय मतांतरे असू शकतात. पण जेव्हा आम्ही सत्तेत असतो तेव्हा कामात राजकारणात आणत नाही. त्यामुळे सत्ता नसताना आपली कामे अडत नसल्याचं ते म्हणाले.
आज आईचा वाढदिवस…
आजचा वेळ मी कुटुंबासाठी वेळ दिला आहे. आज माझ्या आईचा वाढदिवस आहे. त्यामुळे आज आईच्या सहवासात दिवस घालवायचा असं ठरवलं होतं आणि उद्या माझा भाऊ 61 वर्षात पदार्पण करतो आहे. त्याचे केस पांढरे आणि माझे केस काळे आहेत हा रंगाचा परिणाम आहे, अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी बंधू रणजीत पवार य़ांच्यावर केली आहे. वेळ आणि काळ कोणासाठी थांबत नाही त्यामुळे प्रत्येकाने वेळेची आणि काळाची किंमत केली पाहिजे. सोबतच वेळेत कामंही केली पाहिजे, असाही सल्ला त्यांनी तरुणांना दिला.