लाईफस्टाईलAstro Tips : या दिवशी केस कापाल तर येतील अनेक अडचणी

Astro Tips : या दिवशी केस कापाल तर येतील अनेक अडचणी

spot_img
spot_img

Astro Tips : हिंदू धर्मात आठवड्यातील काही दिवस केस-दाढी, नखे कापण्यासाठी शुभ मानले जातात तर काही दिवस अशुभ मानले जातात. अशुभ दिवसात केस-नखे किंवा दाढी कापल्याने पैशाची हानी होते, आरोग्यावर वाईट परिणाम होतो असे म्हटले जाते. त्याचबरोबर शुभ दिवशी केस आणि दाढी कापल्याने कर्जमुक्ती मिळते. पैशाचा फायदा होतो. करिअरमध्ये प्रगती आणि सन्मान मिळतो असे देखील म्हटले जाते.

आठवड्यातील प्रत्येक दिवशी केस आणि दाढी कापल्याने काय परिणाम होतो आणि त्याचा जीवनावर काय परिणाम होतो हे जाणून घेऊया.

सोमवार : सोमवारचा संबंध चंद्राशी आहे. या दिवशी कधीही केस किंवा दाढी कापू नये. अन्यथा त्याचा आरोग्यावर, मनावर, शिक्षणावर आणि मुलांवर अशुभ परिणाम होतो असे मानले जाते. तसेच या दिवशी नखे कापू नयेत असे मानले जाते.

मंगळवार : साधारणत: मंगळवारी अनेकजण केस आणि दाढी कापत नाहीत. हिंदू धर्मात मंगळवारी केस कापणे किंवा दाढी करण्यास मनाई आहे. या दिवशी केस आणि नखे कापणे किंवा दाढी केल्याने आयुर्मान कमी होते. रक्ताशी संबंधित आजार होतात असे मानले जाते.

बुधवार : बुधवारी नखे आणि केस कापणे अत्यंत शुभ आहे. असे केल्याने घरात समृद्धी येते. व्यवसायात फायदा होईल. पैशाचा फायदा होतो. नोकरीत प्रगती होते असे मानले जाते.

गुरुवार : गुरुवारी केस आणि नखे कापू नयेत, दाढीही करू नये. असे केल्याने भगवान विष्णूला राग येऊ शकतो. दांपत्य जीवनात अडचणी येतात असे मानले जाते.

शुक्रवार : शुक्रवारी केस कापणे, दाढी करणे किंवा नखे कापणे खूप चांगले आहे. असे केल्याने जीवनात कीर्ती आणि संपत्ती वाढते. सौंदर्य वाढते. आयुष्यात प्रेम आणि रोमान्स वाढतो. माता लक्ष्मीची कृपा आहे असे मानले जाते.

शनिवार : केस-दाढी, नखे शनिदेवाशी निगडित असून शनिवारी नखे, केस कापल्याने शनिदेव नाराज होतात. शनिवारी केस आणि नखे कापल्याने पैसे कमी होतात, आजार होतात असे मानले जाते.

रविवार : रविवारी सुट्टी असल्याने या दिवशी बहुतांश लोक केस आणि दाढी कापतात, पण तसे करणे योग्य नाही. असे केल्याने स्मरणशक्ती कमी होते. आत्मविश्वास कमी होतो. कामात अपयश येते. पैशाचे नुकसान होते असे मानले जाते.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही)

लेटेस्ट न्यूज़

जाहिरात