पुणे : आचार्य आनंदऋषीजी चौक (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक) येथील उड्डाणपूल लवकरच पूर्ण होणार आहे. त्यामुळे या चौकात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी विद्यापीठ चौक आणि गणेश खिंड रोड परिसरातील वाहतूक बदलण्याचे नियोजन वाहतूक पोलिसांनी केले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक, बाणेर रोड, पाषाण रोड, गणेश खिंड आणि सेनापती बापट रोड येथे प्रस्तावित बदल करण्यात आले आहेत. येत्या दोन ते तीन दिवसांपासून प्रायोगिक तत्त्वावर हा बदल राबविण्यात येणार आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
बाणेर व औंध रस्त्यावरून विद्यापीठ चौकात येणारी वाहने सिग्नल शिवाजीनगरनगरकडे डाव्या लेनवर जाण्याचा प्रस्ताव आहे. विद्यापीठ चौकात पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी वेळ दिला जात आहे.
गणेशखिंड रोडवरून सेनापती बापट रोडवर जाण्यासाठी कॉसमॉस बँकेत ‘यू-टर्न’ देण्यात आला होता. यू-टर्न थांबवून सेनापती बापट रोड जंक्शन उजवीकडे वळण्यास परवानगी देण्यात येणार आहे.
सेनापती बापट रोड (चतुःश्रृंगी मंदिर) ते विद्यापीठ चौकाकडे येणारी सर्व वाहतूक सेनापती बापट रोड जंक्शनवरून डावीकडे वळवून थेट पाषाण रस्त्याकडे वळविण्यात येणार आहे.
औंधला जाण्यासाठी पर्यायी मार्ग
पर्यायी वर्तुळाकार मार्ग १ : गणेशखिंड व सेनापती बापट रोडवरून पुणे विद्यापीठ, चतुःशृंगी पोलिस ठाणे, कस्तुरबा गांधी कॉलनीकडे जाणारी वाहने सिंहगड गेट (पुणे ग्रामीण पोलिस मुख्यालय) येथून बाणेर रोडमार्गे उजवीकडे वळावीत आणि विद्यापीठ चौकातून थेट डावीकडे वळावेत.
पर्यायी मार्ग २ : पाषाण रोडवरून अभिमानश्री सोसायटी, पाषाण रोड जंक्शन, अभिमानश्री सोसायटीकडून उजवीकडे, बाणेर रस्ता जंक्शन उजवीकडे वळून बाणेर रस्त्याने उजवीकडे वळून सरळ विद्यापीठ चौकातून डावीकडे वळून औंध कडे जाता येईल.
पर्यायी मार्ग ३ : सेनापती बापट रोडवरून औंधकडे जाणारी वाहने पाषाण रोडकडून अभिमानश्री सोसायटी, पाषाण रोड जंक्शन, अभिमानश्री सोसायटीकडे उजवीकडून वळण घेतील. बाणेर रोड जंक्शन डावीकडे वळून बाणेर फाट्याकडे , उजवीकडे वळून सरजा हॉटेल कॉर्नरकडे डावीकडे वळून क्रोमा मॉल रोड किंवा बाणेर फाटा उजवीकडे वळून आय. टी. आय. रस्ताने परिहार चौक मार्गे इच्छितस्थळी जावे.