महाराष्ट्रमोठी बातमी : आयोगाच्या निर्णयानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून कोट्यवधीचा पक्षनिधी...

मोठी बातमी : आयोगाच्या निर्णयानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून कोट्यवधीचा पक्षनिधी ट्रान्सफर ?

spot_img
spot_img

मुंबई : राज्यामध्ये जो राजकीय संघर्ष सुरु आहे त्यात दिवसेंदिवस नवनवीन धक्क्यांना सामोरे जावे लागत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी मोठा निर्णय दिला होता. निवडणूक आयोगाने शुक्रवारी शिवसेनेचे नाव आणि चिन्ह कोणाकडे आहे हे जाहीर केले. उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का देत निवडणूक आयोगाने शिवसेनेचे नाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय घेतला होता.


शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. दरम्यान, राज्यभरात दोन्ही बाजूंनी प्रतिक्रिया उमटत आहेत. आयोगाच्या या निर्णयानंतर एक मोठी बातमी समोर येत आहे. आयोगाच्या या निर्णयानंतर एक मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेनेचा कोट्यवधी रुपयांचा पक्षनिधी हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खात्यावर वर्ग करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सत्तासंघर्षातील निवडणूक आयोगाचा निर्णय त्यांच्या विरोधात असल्याने पक्षाचा निधी ठाकरे गटाकडून हस्तांतरित करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
त्यासाठी बँकेत नवीन खाती उघडण्यात आली असून कोट्यवधींचा पक्षनिधी हस्तांतरित करण्यात आला आहे. शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात गेल्यास तेही पक्षाच्या पैशांवर दावा करू शकतात. त्यामुळेच हा निधी आधीच वळविण्यात आल्याचे मानले जात आहे. निधी किती वळवला याची नेमकी किंमत अद्याप समजू शकलेली नाही.

निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय अशा दोन ठिकाणी सुनावणी सुरु होती. शिवसेना पक्ष कोण आणि हे नाव व चिन्ह कोणी वापरावे हे निवडणूक आयोगाने ठरविले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निर्णय झाल्यानंतर शिंदे गटाच्या समर्थकांनी घोषणाबाजी सुरू केली. दुसरीकडे ठाकरे गटाने या निर्णयावर जोरदार टीका केली होती. राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी आपले चिन्ह आणि नाव चोरीला गेल्याचा आरोप केला आहे. नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे शिवसेना भवनावर दावा करणार का, याबाबत चर्चा सुरु असतानाच आता निधी बाबत ही बातमी समोर आली आहे.

लेटेस्ट न्यूज़

जाहिरात