आर्थिकस्टेट बँकेच्या ग्राहकांना मोठा झटका : होम लोन आणि कार लोन झाले...

स्टेट बँकेच्या ग्राहकांना मोठा झटका : होम लोन आणि कार लोन झाले महाग, यामुळे तुमचा ईएमआय इतका वाढेल

होम लोन : एसबीआय बँकेच्या ग्राहकांना लवकरच मोठा धक्का बसणार आहे. देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) कर्जाच्या दरात म्हणजेच एमसीएलआरमध्ये 10 बेसिस पॉईंट म्हणजेच 0.10 टक्क्यांनी वाढ केली आहे. म्हणजेच आता सर्व प्रकारचे होम, कार आणि पर्सनल लोन महाग णार आहे.

spot_img
spot_img

Home Loan : SBI च्या ग्राहकांना लवकरच मोठा धक्का बसणार आहे. भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank Of India) कर्जाच्या दरात म्हणजेच MCLR मध्ये 10 बेसिस पॉईंट म्हणजेच 0.10 टक्क्यांनी वाढ केली आहे. म्हणजेच आता सर्व होम, कार आणि पर्सनल लोन महाग होणार आहे. एसबीआयच्या वेबसाईटनुसार हे नवे दर आज 15 फेब्रुवारीपासून लागू होतील.

आता हे असतील नवे दर
बँकेने सांगितले की, एमसीएलआर दर 7.85 टक्क्यांवरून 7.95 टक्क्यांपर्यंत 10 बीपीएसने वाढविण्यात आला आहे. तर, एक महिन्याचा एमसीएलआर दर 8.00 टक्क्यांवरून 8.10 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे. तीन महिन्यांचा एमसीएलआर जानेवारीतील ८.०० टक्क्यांवरून ८.१० टक्के करण्यात आला आहे. सहा महिन्यांचा एमसीएलआर पूर्वीच्या ८.३० टक्क्यांवरून ८.४० टक्क्यांवर नेण्यात आला आहे. बँकेने सांगितले की, एक वर्षाच्या मुदतीसाठी नवीन दर 8.40 टक्क्यांवरून 8.50 टक्के केला जाईल. दोन वर्षांच्या मुदतीचा एमसीएलआर ८.५० टक्क्यांवरून ८.६० टक्के, तर तीन वर्षांच्या मुदतीचा एमसीएलआर ८.६० टक्क्यांवरून ८.७० टक्के करण्यात आला आहे.

लेटेस्ट न्यूज़

जाहिरात