महाराष्ट्र्रातील राजकारण सर्वश्रुत आहे. सत्तेसाठी काय सुरु आहे हे सर्वांसमोर आहे. दरम्यान आता एका नव्या दाव्यानंतर राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. भाजपकडून मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असू शकतात असे विधान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी करताच राजकरणात खळबळ उडाली आहे.
तसेच काँग्रेसचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा होण्यासाठी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरातही प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले आहेत. प्रकाश आंबेडकरांनी औरंगाबादेत पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. प्रकाश आंबेडकरांनी विधान परिषद निवडणुकीतील सत्यजित तांबे अपक्ष उमेदवारीच्या आडून भाजपवर निशाणा साधला आहे.
तसेच त्यांनी काँग्रेसलाही टोला लगावला आहे. काँग्रेसचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा होण्यासाठी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरातही प्रयत्नशील आहेत. ती खेळी माझ्या अंदाजानं बाळासाहेब थोरात विरोधात राधाकृष्ण विखे पाटील अशी आहे, असं मी त्या ठिकाणी मानतो.
देवेंद्र फडणवीस यांना आवडणार नाही, परंतु भाजपचा नवीन मुख्यमंत्र्यांचा चेहरा हा राधाकृष्ण विखे पाटील होऊ शकतात. त्याचबरोबर जी काही नगरमधली खेळी झालेली आहे, त्यातून बाळासाहेब थोरातांनाही इच्छा झालेली दिसतेय की, आपण काँग्रेसचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा व्हावं, असंही प्रकाश आंबेडकर म्हणालेत. दरम्यान त्यांच्या या वक्तव्यानंतर मात्र राजकारणात खळबळ उडाली आहे.
कारण नुकतेच सत्यजित तांबे यांनी केले जेकेले त्यावरून ते बंड करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे आता श्री.आंबेडकर जे म्हणाले त्यात सत्यता वाटत असल्याने आता राजकीय चर्चांना उधाण आले आहे.