लाईफस्टाईलBlue Tick on Facebook and Instagram: Facebook चा मोठा निर्णय, ब्ल्यू टिकसाठी...

Blue Tick on Facebook and Instagram: Facebook चा मोठा निर्णय, ब्ल्यू टिकसाठी आता लागणार पैसे

spot_img
spot_img

Facebook Blue Tick : फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सॲपची मूळ कंपनी मेटानेही प्रीमियम व्हेरिफिकेशन सेवा जाहीर केली आहे. म्हणजेच आता फेसबुक आणि इन्स्टाग्राम सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला व्हेरिफाइड अकाऊंट म्हणजेच ब्लू टिकसाठी पैसे मोजावे लागणार आहेत. याची किंमत वेबसाठी 11.99 डॉलर (993 रुपये) आणि आयओएससाठी 14.99 डॉलर (1241 रुपये) निश्चित करण्यात आली आहे.

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये प्रीमिअम व्हेरिफिकेशनची सुरुवात होणार आहे. त्यानंतर इतर देशांमध्येही ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. मेटाचे प्रमुख मार्क झुकेरबर्ग यांचा एक संदेश आला आहे. यामध्ये या सेवेची माहिती देण्यात आली आहे.

ट्विटरने आधीच केली घोषणा
Twitter Blue Tick मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरने नुकतीच पेड सब्सक्रिप्शन सर्व्हिस ट्विटर ब्लू लाँच केली आहे. भारतातील मोबाइल युजर्सना ब्लू टिक मिळवण्यासाठी आणि प्रीमियम सब्सक्रिप्शन सर्व्हिसची सुविधा वापरण्यासाठी दरमहा 900 रुपये मोजावे लागतील. तर कंपनीने सर्वात कमी प्रीमियम सब्सक्रिप्शन प्लान 650 रुपयांना लाँच केला होता. हा प्लॅन वेब युजर्ससाठी आहे. कंपनीने गेल्या वर्षी ट्विटर ब्लू लाँच केले होते. अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि जपानसह काही देशांमध्ये हे लाँच करण्यात आले होते.

दीर्घ काळ चाललेली चर्चा
गेल्या अनेक दिवसांपासून फेसबुक ब्लू टिकबाबत काही मोठ्या घोषणा करणार असल्याची चर्चा आहे. मार्क झुकेरबर्गची टीम बऱ्याच काळापासून मेटा व्हेरिफाइडवर संशोधन करत आहे. अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली आणि आता झुकेरबर्गने फेसबुकबाबत ही मोठी घोषणा केली आहे. दरम्यान, सरकारी ओळखपत्राशिवाय अन्य कोणालाही त्यांच्या खात्यांची पडताळणी करता येणार नाही, हे महत्त्वाचे आहे.

लेटेस्ट न्यूज़

जाहिरात