ताज्या बातम्यापुन्हा दोन दिवस पावसाची शक्यता, पहा हवामान अंदाज

पुन्हा दोन दिवस पावसाची शक्यता, पहा हवामान अंदाज

spot_img
spot_img

सध्या देशभरात थंडीची लाट पसरली आहे. अनेक ठिकाणी हुडहुडी भरली आहे. दरम्यान आता यातच एक पावसासंदर्भात बातमी आली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुन्हा दोन दिवस पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे २३ जानेवारी ते २५ जानेवारी दरम्यान राज्यात विविध ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोक्याची चिंता वाढण्याची शक्यता आहे.

त्याचप्रमाणे थंडीबाबतही एक अपडेट आली आहे. सध्या सगळीकडे थंडीने हुडहुडी भरली आहे.
पुढच्या पाच दिवसांमध्ये हा जोर कमी होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, २१ जानेवारीपर्यंत हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मात्र, २२ जानेवारीनंतर येथील हवामानात बदल होईल असेही सांगण्यात आले आहे.

उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली या राज्यांमध्येही पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

लेटेस्ट न्यूज़

जाहिरात