आज प्रत्येकाकडेच स्वतःचे वाहन आहे. अनेकांकडे स्वतःच्या टुव्हीलर आहेत तर अनेकांकडे फोरव्हीलर देखील आहेत. परंतु आता एक महत्वाची बातमी समोर आली आहे. 1 फेब्रुवारीपासून वाहतुकीचे नियम बदलले आहेत.
आता पोलीस दंड करत असून चलन थेट लोकांच्या बँक खात्यातून कापले जाणार असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे काही नियमानुसार 10 हजार रुपयांपर्यंत दंड देखील होऊ शकतो.
पोलिसांनी जुन्या वाहनांकडे लक्ष वळविले असून त्यांची कागदपत्रे, पीयुसी आदी तपासले जात आहे. जर 15 वर्षांपेक्षा वाहने असतील तर ते जप्त केले जात आहे. अनेकांना वाहने मॉडिफाईड करण्याची हौस असते.जर तुम्ही तुमची वाहने मॉडिफाईड केली असतील तर तुम्हाला सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.
पोलीस मॉडिफाईड दुचाकींना पकडून चालान करत आहेत. नवीन वाहतूक नियमांनुसार कोणत्याही वाहनात केलेले फेरफार बेकायदेशीर आहे. यासाठी तुम्हाला दंड होऊ शकतो. दुचाकीही जप्त केली जाऊ शकते. स्वतंत्र प्रेशर हॉर्न लावणे हे देखील नियमाच्या बाहेर आहे.
कर्णकर्कश हॉर्न जर तुम्ही लावले तर चालकाला 500 रुपये किंवा त्याहून अधिक दंड होऊ शकतो. त्यामुळे वाहनात फॅन्सी हॉर्न किंवा सायरन लावणे टाळावे.अनेकांमध्ये बाईकचे सायलेन्सर बदलून विविधवाज काढणारे सायलेन्सर टाकले जात. अशा सायलेन्सरचा वापर केल्यास वाहतूक पोलिस तुम्हाला पकडून चालान करतील. मोटार वाहन कायद्यानुसार वाहनांमध्ये फॅन्सी नंबर प्लेट वापरणे बेकायदेशीर आहे. त्यांवर देखील कारवाई केली जाणार आहे.