महाराष्ट्रमुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दावोसमध्ये रोड शो करणार आहेत का?, हे राजकारणाचे धंदे बंद...

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दावोसमध्ये रोड शो करणार आहेत का?, हे राजकारणाचे धंदे बंद करा; संजय राऊत यांनी योगींना फटकारले

तुम्हाला रोडशोची गरज काय? तुम्ही उद्योगपतींशी चर्चा करायला आला आहात. तुम्ही तुमच्या राज्याच्या विकासासाठी मुंबईचं योगदान घ्यायाल आला आहात तर रोड शो कशासाठी? असा सवालही त्यांनी केला.

spot_img
spot_img

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर आले आहेत. मुंबईत ते अनेक उद्योगपतींशी चर्चा करून उत्तर प्रदेशात गुंतवणूक नेणार आहेत. तसेच ते ताज हॉटेलबाहेर रोडशोही करणार आहेत. त्यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी योगी आदित्यनाथ यांना फटकारले आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दावोसमध्ये रोड शो करणार आहेत का? मग योगी आदित्यनाथ मुंबईत रोड शो का करत आहेत?, असा सवाल करतानाच हे राजकारणाचे धंदे सोडून द्या, अशा शब्दात संजय राऊत यांनी योगींना फटकारले आहे.

राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उद्योगमंत्री दावोसला जात आहेत. तिथे गुंतवणुकदारांची परिषद असते. तिथे जाऊन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री रोड शो करणार आहेत का? गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी दावोसच्या रस्त्यावर रोड शो होणार आहे का? मग यूपीच्या मुख्यमंत्र्यांना ताजमहल हॉटेल समोर रोड शो करण्याची गरज काय? हे राजकारणाचे धंदे बंद करा, असं संजय राऊत म्हणाले.

आपण आलात तुमचा सन्मान आहे. तुम्ही सन्माने निघून जा. उद्योगपतींशी चर्चा करा. तुमच्याविषयी प्रेम आदर आहे तो राहील. फक्त राजकीय उद्योग करू नका, असं राऊत यांनी योगी आदित्यनाथ यांना सुनावले आहे.

तुम्हाला रोडशोची गरज काय? तुम्ही उद्योगपतींशी चर्चा करायला आला आहात. तुम्ही तुमच्या राज्याच्या विकासासाठी मुंबईचं योगदान घ्यायाल आला आहात तर रोड शो कशासाठी? असा सवालही त्यांनी केला.

नोएडात फिल्म इंडिस्ट्री उभारली जात आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. फिल्म इंडस्ट्री ही संपूर्ण देशाची आहे. दादासाहेब फाळके यांनी महाराष्ट्रात फिल्म इंडस्ट्रीची मुहूर्तमेढ रोवली. योगी मुंबईत आलेत. त्यांना कुणालाही भेटू द्या. योगींना फिल्म सिटी बनवायची असेल तर स्वागत आहे. सर्व देशातील राज्यांमध्ये फिल्म इंडस्ट्री झाली पाहिजे. दक्षिणेतही आहे.

योगींनीही करावी. स्वागत आहे. पण मुंबईतील फिल्म इंडस्ट्री अशी कोणी खेचून नेऊ शकते का? अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित हे काय गाझियाबाद, फरिदाबाद, नोएडा, कानपूर, लखनऊला उडत जाऊन राहणार आहे का? असा सवाल त्यांनी केला.

लेटेस्ट न्यूज़

जाहिरात