लाईफस्टाईलतुम्ही अंडी खाता? मग ही बातमी वाचाच..अन्यथा आरोग्यावर होतील वाईट परिणाम

तुम्ही अंडी खाता? मग ही बातमी वाचाच..अन्यथा आरोग्यावर होतील वाईट परिणाम

spot_img
spot_img

अंडी हे जगभरात लोकप्रिय आहेत. अनेकांचा दररोजचा नाश्ता देखील या अंड्याशिवाय पूर्ण होत नाही.
अंडी हे पौष्टिकतेने परिपूर्ण असते. प्रथिने शरीराच्या स्नायूंच्या वाढीसाठी चांगली मानली जातात.

प्रथिनांशिवाय अंड्यांमध्ये लोह, जीवनसत्त्वे ए, बी6, बी12, फोलेट, अमीनो ऍसिड, फॉस्फरस आणि सेलेनियम आढळतात. व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी 12 आणि सेलेनियम रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यास मदत करतात. पण तुम्हाला माहिती आहे का, काही लोकांसाठी अंडी खाणं खूपच हानिकारक आहे. त्याचबरोबर अनेक गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्यांनीसुद्धा अंड्याचं सेवन करण्यापासून दूर राहणं गरजेचं आहे. चला तर, आज आपण जाणून घेऊया कुणी अंडी खाणं टाळावं.

डायबेटिस
डायबेटिस ज्यांना आहे अशा रुग्णांनी अंडी खाण्यापासून दूर राहिलेल कधीही चांगले. काही संशोधनानुसार दररोज अंडी खाल्ल्यास डायबेटिस होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे जर तुम्हाला डायबेटिस असेल तर तुमच्या डॉक्टरांकडून तुमच्या आहारात अंड्यांचा समावेश किती करावा, याबाबत सल्ला घ्यावा. त्याचप्रमाणे जास्त वजन असणाऱ्यांनी देखील अंडी खाणं टाळावं.

पचनशक्ती
साल्मोनेला हा एक जीवाणूजन्य संसर्ग आहे, ज्यामुळे अतिसार, उलट्या, ताप, डोकेदुखी, मळमळ असे आजार उद्भवतात. यामुळे अन्नातून विषबाधा होते. कोंबडीच्या संक्रमित विष्ठेच्या संपर्कात अंडी आणि अंड्याचे कवच आल्यास ते साल्मोनेला बॅक्टेरियानं दूषित होतं. अशी अंडी खाल्ली आणि तुमची पचनशक्ती कमकुवत असेल, तर तुम्हाला विषबाधा होऊ शकते.

कोलेस्टेरॉल
अंड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कोलेस्टेरॉल आढळते. जर तुम्ही याचे जास्त प्रमाणात किंवा रोज सेवन करत असाल तर तुम्हाला हृदयाशी संबंधित समस्या होऊ शकतात. म्हणूनच हृदयाचे आजार असणऱ्यानी अंडी कमी प्रमाणात खावीत.

लेटेस्ट न्यूज़

जाहिरात