ताज्या बातम्याचार देशांत भूकंपाचा हादरा, पत्त्यांसारख्या इमारती कोसळल्या; पहा मोदींची पहिली प्रतिक्रिया

चार देशांत भूकंपाचा हादरा, पत्त्यांसारख्या इमारती कोसळल्या; पहा मोदींची पहिली प्रतिक्रिया

spot_img
spot_img

तुर्कस्तानमधील या भूकंपानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या संकटात भारत तुर्कस्तानच्या पाठीशी उभा आहे. आम्ही तुर्कस्तानला हवी तितकी मदत करू. तुर्कस्तानमध्ये भूकंप होताना दिसत आहेत.

तुर्कस्तानमध्ये आज पहाटे भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.8 इतकी होती. हे धक्के एक नव्हे तर चार देशांमध्ये जाणवले आहेत. तुर्कस्तान आणि सीरियामध्ये भूकंपात ३६० जणांचा मृत्यू झाला होता. तुर्कस्तानमध्ये सौदीचे सात नागरिक मारले गेले आहेत. या भूकंपामुळे लोक गाढ झोपेत असताना अनेकांचा झोपेतच मृत्यू झाला. या भूकंपामुळे किमान १५० इमारती कोसळल्या आहेत. या भूकंपाचे व्हिडिओ व्हायरल झाले असून ते भूकंपाच्या तीव्रतेचे वर्णन करत आहेत.

तुर्कस्तानमध्ये आज पहाटे 4 वाजून 17 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. त्यामुळे अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्या. या इमारतीखाली अनेक लोक गाडले गेले आहेत. त्यामुळे या लोकांना बाहेर काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे.

तुर्कस्तानच नव्हे तर इस्रायल, पॅलेस्टाईन, सायप्रस, लेबनॉन आणि इराकमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. यापूर्वी तुर्कस्तान आणि इराणच्या सीमेवर भूकंप झाला होता. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ५.९ इतकी नोंदवण्यात आली.

लेटेस्ट न्यूज़

जाहिरात