लाईफस्टाईलभन्नाट ऑफर ! 15 हजारांपेक्षा कमी किमतीत खरेदी करा Vivo चा 5जी...

भन्नाट ऑफर ! 15 हजारांपेक्षा कमी किमतीत खरेदी करा Vivo चा 5जी स्मार्टफोन

spot_img
spot_img

जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही योग्य वेळ आहे. कारण ग्राहकांना Vivo T1 5G स्मार्टफोनवर जोरदार सूट मिळत आहे. जे तुमच्यासाठी खूप फायदेशीर देखील ठरू शकते.

या फोनवर तुम्हाला डिस्काउंट मिळू शकतो. याचे फीचर्स आणि बॅटरीही खूप छान आहे. ते विकत घेण्यासाठी जास्त पैसे खर्च करावे लागत नाहीत. तर चला तर मग याविषयी जाणून घेऊयात –

Vivo T1 5G चे फीचर्स
याच्या फीचरबद्दल बोलायचे झाले तर विवोच्या या मोबाईल फोनमध्ये तुम्हाला 6.58 इंचाचा फुल एचडी प्लस एलसीडी डिस्प्ले मिळेल. जे वॉटरड्रॉप नॉचसह 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट सपोर्टमध्ये येते. विवोचा आतापर्यंतचा सर्वात हलका ५जी स्मार्टफोन या यादीत येतो. तसेच क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसर प्रोसेस उपलब्ध आहे. याशिवाय रॅम आणि स्टोरेजबद्दल बोलायचे झाले तर यात तुम्हाला 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज मिळते.

Vivo T1 5G चा कॅमेरा
कॅमेऱ्याच्या क्वालिटी बद्दल बोलायचे झाले तर या मोबाइलमध्ये तुम्हाला रियर ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो. यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 2 मेगापिक्सलचा पोर्ट्रेट लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर कॅमेरा देण्यात आला आहे. तर सेल्फी काढण्यासाठी फोनच्या फ्रंटमध्ये 16 मेगापिक्सलचा कॅमेरा उपलब्ध आहे.

Vivo T1 5G बॅटरी
बॅटरीबद्दल बोलायचे झाले तर पॉवरसाठी या फोनमध्ये तुम्हाला 5,000mAh ची दमदार बॅटरी मिळते. जो 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसोबत येतो. याशिवाय फोन कनेक्टिव्हिटीसाठी 5जी, 4जीएलटीई, यूएसबी पोर्ट, वायफाय, ब्लूटूथ आणि जीपीएस आदी फीचर्स मिळतात.

या हँडसेटवर उपलब्ध असलेल्या ऑफरबद्दल बोलायचे झाले तर याच्या वास्तविक किंमतीवर 27 टक्के सूट मिळत असून 14,499 रुपये खरेदी करू शकता. तसेच काही जुन्या मॉडेलच्या फोनवर ग्राहकांना 13,800 रुपयांची एक्सचेंज ऑफरही मिळत आहे.

तसेच, बँकेच्या ऑफरअंतर्गत तुम्हाला आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी बँकेच्या कार्डद्वारे पेमेंट केल्यास 1000 रुपयांपर्यंत सूट मिळते. एवढंच नाही तर फ्लिपकार्ट अॅक्सिस कार्डने शॉपिंग केल्यास तुम्हाला 5 टक्के कॅशबॅकही मिळत आहे. या सर्व ऑफर्सचा फायदा घेतल्यानंतर तुम्हाला या डिव्हाइसची किंमत अगदी स्वस्तात मिळते.

Vivo Y35 वर ही भरघोस सूट
विवोच्या या डिव्हाइसवर तुम्हाला प्रचंड सूट दिली जात आहे. या डीलमध्ये तुम्हाला कंपनीकडून 20 टक्के सूट आणि एक्सचेंज ऑफरदेखील मिळत आहे. यात बँकेच्या ऑफरचाही समावेश आहे, ज्यामुळे या फोनची किंमत कमी होऊ शकते.

लेटेस्ट न्यूज़

जाहिरात