आता अहत्वाची बातमी आली आहे. सत्यजित तांबे यांनाही कॉंग्रेसमधून निलंबित करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान सत्यजित तांबे यांच्याबाबत भाजपनेही भूमिका जाहीर करावी असे आवाहन कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.
आता नाशिकमधून शुभांगी पाटील याना महाविकास आघाडीने उमेदवारी जाहीर केल्याचे म्हटले आहे. नागपूरमधून सुधाकर अडबाले, अमरावतीमधून धीरज लिंगाडे, औरंगाबादमधून विक्रम काळे, नाशिकमधून शुभांगी पाटील आणि कोकणातून बाळाराम पाटील हे अधिकृत उमेदवार असल्याचे महाविकास आघाडीने जाहीर केले आहे. दरम्यान राजकीय चर्चाकारांच्या सोशल मीडियावर चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत. की आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात कोणाचा प्रचार करणार?
यावर देखील नाना पटोले यांनी स्पष्टोक्ती दिली आहे की, शुभांगी पाटील या महाविकास आघाडीच्या उमेदवार असून त्यांच्या प्रचारासाठी बाळासाहेब थोरात नक्की येणार आहेत. ते रुग्णालयात आहेत. लवकरच ते बाहेर येतील अन पाटील यांचाच प्रचार करतील असे पटोले यांनी स्पष्ट केले आहे.
यावेळी भाजपवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की,
बेरोजगारी आणि नोकरीत काम करणारे लोकं नाराज आहेत. नाशिकमध्ये भाजपला साधा उमेदवार मिळाला नाही, स्वतःला मोठा पक्ष म्हणवून घेतो असे म्हणणाऱ्या पक्षाची अशी अवस्था झाल्याचा टोला पटोले यांनी लगावला आहे.