महाराष्ट्रकुणालाही पैसे न देता घरबसल्या ३५० रुपयांत अशा पद्धतीने काढा ड्रायव्हिंग लायसन्स

कुणालाही पैसे न देता घरबसल्या ३५० रुपयांत अशा पद्धतीने काढा ड्रायव्हिंग लायसन्स

spot_img
spot_img

अनेक ठिकाणी ड्रायव्हिंग लायसन्स ओळखपत्र म्हणून वापरले जातात. त्यामुळे ड्रायव्हिंग लायसन्स मिळवणं गरजेचं आहे. सध्या ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही, कोणत्याही एजंटला पैसे देण्याची गरज नाही, आरटीओ कार्यालयात जाण्याची गरज नाही. घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलफोनवरून ऑनलाईन लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स मिळवू शकता, त्यासाठी कोणत्याही एजंटला जास्त पैसे देण्याची गरज नाही. फक्त 350 रुपयांत लायसन्स काढू शकता. त्यासाठी आरटीओ कार्यालय मध्ये चकरा मारण्याची गरज नाही.

ड्रायव्हिंग लायसन्ससाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा?
-transport.maharashtra.gov.in जाऊन अर्ज घ्या आणि त्याची प्रिंट काढा.
-भरलेला फॉर्म आरटीओमध्ये सबमिट करा.
-सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट करा.
-ड्रायव्हिंग टेस्टसाठी स्लॉट मिळेल.
-जर तुम्ही या परीक्षेत पास झालात तर तुम्हाला पोस्टाद्वारे लगेच लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स मिळतील

खालील काही Driving licence प्रकार:-

मोटार वाहन – व्यावसायिक वाहन किंवा मालवाहू वाहन चालवू इच्छिणाऱ्या कोणालाही अशा परवानगीसाठी अर्ज करणे आवश्यक आहे. वाहतूक वाहन चालविण्याचा परवाना खालील प्रकारांमध्ये विभागला जातो.

हलका मोटार वाहन – हा परवाना ऑटो-रिक्षा, जीप आणि डिलिव्हरी व्हॅन सारख्या हलक्या मोटार वाहनांसाठी आहे.

मध्यम प्रवासी वाहने – हा परवाना मिनीव्हॅन, टेम्पो आणि प्रवासी वाहून नेण्यासाठी वापरल्या जाणार्या इतर वाहनांसारख्या मध्यम प्रवासी वाहनांसाठी आहे.

लेटेस्ट न्यूज़

जाहिरात