आर्थिकGold Price: सोन्याचे भाव एकदम उतरले,खरेदी करण्यासाठी गर्दी

Gold Price: सोन्याचे भाव एकदम उतरले,खरेदी करण्यासाठी गर्दी

spot_img
spot_img

Gold Price Today: आजपासून नव्या आठवड्याला सुरुवात झाली आहे. जर तुम्ही या आठवड्यात सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आज सोने आणि चांदी (Gold-Silver Price) या दोन्हीच्या दरात घसरण दिसून आली आहे, म्हणजेच आज तुम्हाला सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी कमी पैसे खर्च करावे लागतील. आजचा सोन्याचा भाव 57,000 रुपयांच्या खाली घसरला आहे. जाणून घेऊयात आजचा 10 ग्रॅम सोन्याचा भाव-

किती स्वस्त आहे सोनं-चांदी?
मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव 0.05 टक्क्यांनी घसरून 56715 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तर चांदीच्या किंमतींबद्दल बोलायचे झाले तर चांदीचे दरही 0.32 टक्क्यांच्या वाढीसह 66210 रुपये प्रति किलोवर ट्रेड करत आहेत.

जागतिक बाजारपेठेतील किंमती
आंतरराष्ट्रीय बाजाराबद्दल बोलायचे झाले तर येथील सोन्याचा भाव 0.12 टक्क्यांनी वाढून 1,864.99 डॉलर प्रति औंस झाला आहे. तर चांदीचा भाव 0.23 टक्क्यांच्या वाढीसह 21.98 डॉलरवर आहे.

आपल्या शहराची किंमत कशी तपासावी?
तुम्ही तुमच्या घरी बसूनही सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, तुम्ही 8955664433 नंबरवर मिस्ड कॉल देऊनच किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुमचे मेसेज येतील.

सोन्याची शुद्धता ओळखा
सोन्याचे दागिने खरेदी करताना आधी त्याची शुद्धता जाणून घ्या. 24 कॅरेट सोनं सर्वात शुद्ध आहे. सोन्याचे दागिने २२ किंवा १८ कॅरेट सोन्यापासून बनवले जातात. म्हणजे २ कॅरेट सोने इतर कोणत्याही धातूच्या २ कॅरेटमध्ये मिसळले जाते. दागिने खरेदी करण्यापूर्वी ज्वेलर्सकडून सोन्याची शुद्धता जाणून घ्या.

लेटेस्ट न्यूज़

जाहिरात