आर्थिकState Bank Of India: स्टेट बँकेत खाते असणाऱ्यांसाठी खुशखबर, पाहा सविस्तर

State Bank Of India: स्टेट बँकेत खाते असणाऱ्यांसाठी खुशखबर, पाहा सविस्तर

spot_img
spot_img

State Bank of India: स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून एफडीच्या व्याजदरात वाढ करण्यात आली  आहे (state bank of india fd interest rates 2023). स्टेट बँक ऑफ इंडिया 7 दिवसांपासून 10 वर्षांपर्यंतच्या मुदत ठेवींवर आकर्षक व्याज दर देते ज्यात अनेक आकर्षक वैशिष्ट्ये आणि फायदे आहेत. ज्येष्ठ नागरिकांना 0.8 टक्क्यांपर्यंत अतिरिक्त व्याज दिले जाते. आणि सर्वसामान्यांसाठी वार्षिक 2.90% ते 5.40% पर्यंत व्याज दर आहेत.

सर्व वयोगटातील ग्राहकांना त्यांच्या खात्रीशीर परताव्याच्या सुविधेमुळे बचत करण्यासाठी एफडी हा आतापर्यंतचा सर्वात विश्वासार्ह मार्ग आहे. ग्राहकाने निवडलेल्या कालावधीसाठी बँक ग्राहकांच्या ठेवींवर आकर्षक व्याज दर देते.

पाहा काय आहे नव्या एफडीचा व्याजदर
2 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेवरील व्याजदर खाली दिले आहेत.

कालावधी नियमित ग्राहक ज्येष्ठ नागरिक
7 दिवस ते 45 दिवस 2.90% 3.40%
46 दिवस ते 179 दिवस 3.90% 4.40%
180 दिवस ते 210 दिवस 4.40% 4.90%
211 दिवस ते 1 वर्ष पेक्षा कमी 4.40% 4.90%
1 वर्ष ते 2 वर्ष पेक्षा कमी 5.00% 5.50%
2 वर्ष ते 3 वर्ष पेक्षा कमी 5.10% 5.60%
3 वर्ष ते 5 वर्ष पेक्षा कमी 5.30% 5.80%
5 वर्ष आणि 10 वर्षापर्यंत 5.40% 6.20%

एसबीआय फिक्स्ड डिपॉझिट योजनेचे प्रकार State Bank of India Fixed Deposit Schemes
स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना विविध प्रकारच्या मुदत ठेवी देते. या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून ग्राहकांना वेगवेगळे फायदे मिळू शकतात. एसबीआयच्या माध्यमातून ग्राहकांना देण्यात येणाऱ्या सर्व मुदत ठेव योजनांचा तपशील खालीलप्रमाणे आहे..

  • एसबीआय टर्म डिपॉझिट Sbi Term Deposit
  • एसबीआय कर बचत योजना Sbi Car Bachat Yojana
  • एसबीआय फिक्स्ड डिपॉझिट इन्व्हेस्टमेंट स्कीम Sbi Fixed Deposit Investment Scheme
  • SBI वार्षिकी जमा योजना Sbi Varshik Jama Yojana
  • एसबीआई वीकेयर

लेटेस्ट न्यूज़

जाहिरात