जिओकडून ८९५ रुपयांत एक खास प्रकारचा वार्षिक प्लॅन दिलाजात आहे. ज्यामध्ये युजर्संना वर्षभर फ्री कॉलिंगचा आनंद घेता येणार आहे. तसेच दररोज २ जीबी डेटा दिला जातो. मात्र, ही ऑफर फक्त जिओ फोन युजर्ससाठी आहे. म्हणजे जर तुम्ही जिओचा फोन वापरत असाल तर तुम्हाला वर्षभर स्वस्तात डेटा आणि कॉलिंगचा आनंद घेता येणार आहे.
जिओचा ८९५ रुपयांचा रिचार्ज प्लॅन एक वर्षाच्या वैधतेसह येतो. पण या प्लॅनची वैधता ३३६ दिवसांची आहे. खरे तर टेलिकॉम कंपन्यांचे सर्कल २८ दिवसांचे असते. त्यानुसार कंपनी ३३६ दिवसांची वैधता देते. या प्लॅनमध्ये युजर्संना एकूण २४ जीबी डेटा दिला जातो. म्हणजेच युजर्संना दरमहिन्याला २ जीबी डेटा वापरता येणार आहे. मात्र, वर्षभर मोफत अनलिमिटेड कॉलिंगचा आनंद घेता येणार आहे. तसेच २८ दिवसांसाठी ५० एसएमएस दिले जातील. त्याचप्रमाणे वर्षभरात १२ एसएमएस प्लॅन दिले जातील. या प्लॅनमध्ये युजर्संना जिओ टीव्ही आणि जिओसिनेमाचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जात आहे.
टीप – हा प्लॅन अशा युजर्ससाठी आहे ज्यांचा डेटा खर्च खूप कमी आहे. जिओचा हा एकमेव वार्षिक प्लॅन आहे, जो जिओ फोन युजर्ससाठी ऑफर केला जातो. जिओच्या वतीने जिओ फोन युजर्ससाठी २८ आणि २३ दिवसांची वैधता असलेले प्लान ऑफर केले जातात. याची किंमत ७५ ते २२३ रुपयांदरम्यान आहे, जे युजर्स आपल्या सोयीनुसार जिओ वेबसाइटवरून रिचार्ज करू शकतात.