केस गळण्याच्या सदम्या अनेकांना जाणवतात. परंतु हे प्रमाण जर कमी असेल काही अडचण नाही. परंतु जर हेच केस गळण्याचे प्रमाण वाढले तर मात्र मोठी समस्या निर्माण होते. केस गळण्याने अनेकांना टक्कल पडू लागते.
सध्याची बदलती जिवनशैली, तणाव, पोषक तत्वांची कमतरता आदींमुळे केसांच्या विविध समस्या निर्माण होत असतात. जर तुम्हालाही कमी वयातच टक्कल पडू नये असे वाटत असेल तर केसांच्या वाढीसाठी, मुळापासून मजबूत होण्यासाठी काही पदार्थांचा आहारात समावेश करा. चला जाणून घेऊयात त्याबद्दल –
अंडी : केसांच्या मजबुतीसाठी प्रथिने हा महत्वाचा घटक असतो. यासाठी आहारात प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश करा. यासाठी अंड्याचे सेवन करावे. अंड्यांमध्ये प्रोटीनचे प्रमाण खूप जास्त असते. प्रथिने केसांना मुळांपासून मजबूत करतात.
हिरव्या भाज्या : या पालेभाज्यांमध्ये भरपूर लोह असते, त्यामुळे केसांची वाढ अन मजबुती दोन्ही वाढते. केसांच्या पेशी देखील दुरुस्त करते. कधीकधी लोहाच्या कमतरतेमुळे केस झपाट्याने गळतात. त्यामुळे हिरव्या भाज्यांसह इतर लोहयुक्त पदार्थांचे सेवन करावे.
व्हिटॅमिन सी : केस कमकुवत होणे किंवा तुटणे हे व्हिटॅमिन ‘सी’ च्या कमतरतेमुळे होते. व्हिटॅमिन ‘सी’युक्त पदार्थांचे सेवन केसांच्या वाढीसाठी फायदेशीर आहे. लिंबू, संत्री, किवी इत्यादी लिंबूवर्गीय फळे रोज खावीत.
ओमेगा ३ फॅटी ऍसिड : याद्वारे केसांना भरपूर पोषण मिळते. बदाम, अक्रोड, अंबाडीच्या बियांमध्ये ओमेगा-३ फॅटी ऍसिड भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे त्याचा आहारात समावेश करावा.
गाजर : केसांच्या पेशींच्या विकासासाठी व्हिटॅमिन ए खूप आवश्यक आहे. त्यामुळे आहारात गाजराचा रस तुम्ही नक्कीच समाविष्ट करावा तुम्हाला फायदा होईल.