Health Tips : सध्या वाटाणा पिकाचा सिझन आहे. हिवाळ्यात वाटाणा मोठ्या प्रमाणात उत्पादित होतो. त्याच्या मधुर चवीमुळे लोक ही ते आवर्जून खातात. वाटण्यापासून वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. परंतु वाटाणा जास्त खाणे काही लोकासांठी घातक ठरू शकते. चला जाणून घेऊयात त्याबद्दल
ऍसिडिटी
ज्या लोकांना ऍसिडिटी आहे त्यांनी वाटाण्याचे सेवन करणे टाळावे. त्याचे असे की वाटाणा थोडा पचायला जड असतो. त्यामुळे अशा व्यक्तींना याचा खूप त्रास होऊ शकतो.
किडनी
ज्या लोकांना किडनीशी संबंधित समस्या आहेत, त्यांनी देखील जास्त प्रमाणात वाटाणा खाणे टाळले पाहिजे. वाटण्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे किडनीच्या कामात समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.
लठ्ठ लोक
ज्या लोकांचे वजन वाढलेले आहे त्यांनी वाटाण्याचे सेवन कमी करावे. या भाजीमध्ये प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असल्याने ते शरीरावरील चरबी वाढवण्याचे काम करेल.
युरिक ऍसिडचा त्रास
ज्यांना युरिक ऍसिडचा त्रास असणाऱ्यांनी जास्त खाणे टाळावे. भाजीमध्ये प्रथिने, एमिनो ऍसिड, व्हिटॅमिन डी आणि फायबर जास्त असते जे तुमच्या युरिकला चालना देण्याचे काम करते.