लाईफस्टाईलHeart Health: हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी घ्या स्ट्रॉबेरीची मदत, जाणून घ्या खाण्याची...

Heart Health: हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी घ्या स्ट्रॉबेरीची मदत, जाणून घ्या खाण्याची योग्य पद्धत

Eat Strawberry For Healthy Heart: सर्व फळांमध्ये स्ट्रॉबेरी हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. Strawberry फायबरसारख्या घटकांनी समृद्ध असतो. स्ट्रॉबेरी कशी खावी, हे आम्ही तुम्हाला या लेखात सांगणार आहोत.

spot_img
spot_img

Eat Strawberry For Healthy Heart: सतत बदलणारी जीवनशैली आणि चटर फटर पदार्थ यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या आजारांना निमंत्रण दिले आहे. अनेक गंभीर आजारांमध्ये हृदयाशी संबंधित अनेक समस्यांचाही समावेश असतो. त्यासाठी तुम्ही आपल्या आहाराकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. हृदय निरोगी ठेवण्यासाठी आणि आजारांपासून दूर ठेवण्यासाठी तुम्ही स्ट्रॉबेरी खाऊ शकता शकता. आपल्या आहारात आणि दिनचर्येत स्ट्रॉबेरीचा समावेश केल्यास हृदयाचे आरोग्य निरोगी राहील.

स्ट्रॉबेरी पोषक तत्वांनी समृद्ध आणि हृदय निरोगी ठेवण्यास उपयुक्त आहे. सर्व फळांमध्ये आंबट-गोड स्ट्रॉबेरी हृदयासाठी आरोग्यदायी व उत्तम मानली जाते. जर आपण नियमितपणे मर्यादित प्रमाणात स्ट्रॉबेरी खाल्ली तर आपण हृदयविकाराचा धोका टाळू शकता. जाणून घेऊया कोणत्या प्रकारे आहारात याचा समावेश करू शकता…

एका संशोधनानुसार स्ट्रॉबेरी हृदयाला निरोगी ठेवते. यात फायबर, अँटी-ऑक्सिडेंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. तसेच पोटॅशियम, व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-ई, फॉस्फरस यांसारखे घटक यात आढळतात. यात असलेले नायट्रेट्स हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात.

स्ट्रॉबेरी खाण्याचे मार्ग

1. स्ट्रॉबेरी चा रस
हृदय निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही स्ट्रॉबेरीचा रस वापरू शकता. चवीबरोबरच आरोग्यासाठीही हे खूप फायदेशीर ठरेल. स्ट्रॉबेरीच्या रसात तुम्ही तुमच्या आवडीनुसार इतर फळांचाही समावेश करू शकता.

2. कोशिंबीरमध्ये याचा समावेश करा
कोशिंबीरमध्ये आंबट-गोड चव घालण्यासाठी आपण स्ट्रॉबेरी घालू शकता. हे बनवण्यासाठी काकडी, हिरवी कोथिंबीर, टोमॅटो अशी इतर फळे आणि भाज्याही निवडू शकता.

3. रायता
स्ट्रॉबेरी रायता चवीला खूप मजेशीर आहे. त्याची चव आंबट-गोड असते आणि जेवणाबरोबर तुम्ही त्याचा आनंद घेऊ शकता. त्यात कॅलरीज खूप कमी प्रमाणात आढळतात.

Vinod Pund
Vinod Pund
Ahmednagar News Staff | He writes news & current affair

लेटेस्ट न्यूज़

जाहिरात