लाईफस्टाईलHow to Store Cut Vegetables: कट केलेल्या भाज्या अश्या पद्धतीने साठवून ठेवा,...

How to Store Cut Vegetables: कट केलेल्या भाज्या अश्या पद्धतीने साठवून ठेवा, टिकतील जास्त काळ

spot_img
spot_img

How to Store Cut Vegetables:स्वयंपाकघराची कामे लवकर पूर्ण करण्यासाठी आणि वेळेची बचत करण्यासाठी तुम्हीही काही तास किंवा एक दिवस अगोदर भाज्या कापून फ्रिजमध्ये ठेवता का? तर आज आम्ही तुमच्यासोबत चिरलेल्या भाज्या फ्रिजमध्ये कशा साठवून ठेवाव्यात याच्या टिप्स आणि ट्रिक्स शेअर करणार आहोत. त्यांच्या मदतीने भाज्या दीर्घकाळ टिकतील आणि त्यांचे पोषक गुणही टिकून राहतील.

हिरव्या भाज्या कशा साठवायच्या?

पालक, मेथी, कोथिंबीर, पुदिना यांची पाने खूप लवकर खराब आणि सडायला लागतात, म्हणून ती अश्याप्रकारे फ्रीजमध्ये ठेवा.

  • त्यांची पाने नीट स्वच्छ करून कापून घ्या. पानांसह देठ ठेवू नका.
  • कोरडी, कुजलेली पाने काढा अन्यथा संपूर्ण भाजी खराब होते.
  • पालेभाज्या कागदात गुंडाळून ठेवा. यामुळे त्यांचा ओलावा टिकून राहतो. कागदाशिवाय दुसरा पर्याय म्हणजे पातळ सुती कापड. त्यात गुंडाळून ठेवल्यानेही ते जास्त काळ टिकतात.

कांदा-लसूण कसा साठवायचा?

जवळजवळ प्रत्येक भाजीमध्ये कांदा आणि लसूण आवश्यक असतो, ज्यामुळे लोक एकाच वेळी जास्त प्रमाणात घेतात. पण जेव्हा ते कोरडे पडू लागतात तेव्हा कांदा आणि लसूण सोलून, कापून हवाबंद डब्यात भरून फ्रिजमध्ये ठेवणे हा त्यांचा साठा करण्याचा मार्ग आहे. पण हो, फ्रीजमध्ये ठेवल्यानंतरही पुढील २४ तासांत कांदा वापरा आणि पुढील दोन दिवसात लसूण वापरा.

भेंडी ची साठवणूक कशी करावी?

भेंडी धुऊन लगेच कापली की ती नीट तयार होत नाही, त्यामुळे लोक ती आधीच कापून घेतात. त्यामुळे त्याचा ताजेपणा कायम ठेवण्यासाठी ते नीट धुवून पाणी वाळवून कापून नेटबॅगमध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवावे. असे केल्याने तुम्ही भेंडी 4-5 दिवस वापरू शकता.

वटाणा कसा साठवायचा?
वटाणा सोलायलाही बराच वेळ लागतो, त्यामुळे आधी सोलून प्लॅस्टिकच्या पिशवीत किंवा एअरटाइट कंटेनरमध्ये भरून फ्रिजमध्ये ठेवा.

शिमला मिरची कशी साठवावी?
लाल, हिरवी आणि पिवळी शिमला मिरची कापून प्लास्टिकच्या पिशवीत किंवा हवाबंद कंटेनरमध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवावी.

लेटेस्ट न्यूज़

जाहिरात