लाईफस्टाईलगोड व रसायनमुक्त कलिंगड विकत हवं असेल तर या ट्रिक्स लक्षात ठेवा,...

गोड व रसायनमुक्त कलिंगड विकत हवं असेल तर या ट्रिक्स लक्षात ठेवा, कधीच नाही होणार फसवणूक

spot_img
spot_img

कलिंगड अर्थात टरबूज हे उन्हाळ्यात सर्वाधिक खाल्ले जाणारे फळ आहे. कलिंगड हे एक उपयुक्त फळ आहे, त्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. कलिंगड सगळ्यांनाच आवडतं. बाजारात विविध प्रकारचे कलिंगड उपलब्ध आहेत. शरीरातील विविध आजारांपासून मुक्ती मिळण्यासाठी आणि उन्हाच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी टरबूज खाल्ले पाहिजे.
काही टरबूज हे अतिशय गोड असतात तर काही कमी गोड असतात. पैसे देऊनही गोड टरबूज मिळाले नाहीत तर खूपच वाईट वाटते. हल्ली रसायने किंवा इंजेक्शन टाकून फळे पिकवली जातात. कलिंगड खरेदी करताना काही गोष्टी लक्षात घेतल्यास चांगले टरबूज खरेदी करता येईल.

कलिंगड गोड आहे की नाही हे कसे ओळखावे?
खरेदी करताना कलिंगड गोड आहे का हे पाहायचे असेल तर हातात धरून त्यावर मारा. कलिंगाडामधून येणाऱ्या आवाजावरून कलिंगड कच्चा आहे की पिकलेला हे कळू शकतं. कलिंगडामधून टप टप आवाज येत असेल तर तो चांगला पिकला आहे असे समजावे. कलिंगडावर मारल्यानंतर मोठा आवाज आला असता तर तो पिकलेलं असतं आणि आवाज कमी येत असेल तर ते कच्चं असू शकतं.


कलिंगडाला जाड हिरव्या रेषा आणि मध्ये पातळ हिरव्या रेषा असतील तर ती कलिंगड गोड असू शकते. गडद रंगाचे कलिंग अधिक गोड असते. कलिंगड्याचे वजन पाहून कलिंगड गोड आहे की नाही हे कळू शकते. अनेकदा कलिंगड आकाराने मोठे पण वर उचलल्यानंतर हलके असतात.
कलिंगडाच्या आकारापेक्षा वजन जास्त असेल तर ते विकत घ्या हे कलिंगड गोड निघतील. कलिंगडाच्या माथ्यावर हलकी पिवळी रेषा आहे. हे फळ जमिनीवर लावले जाते. या पिवळ्या भागाचा रंग जितका गडद तितकाच तो गोड असतो. हलका पिवळा किंवा पांढरा रंग असलेले कलिंगड कच्चे असतात.

लेटेस्ट न्यूज़

जाहिरात