अहमदनगर बातम्याअहमदनगर जिल्ह्यात नर्तिका पुरविण्याच्या बहाण्याने भलताच प्रकार

अहमदनगर जिल्ह्यात नर्तिका पुरविण्याच्या बहाण्याने भलताच प्रकार

spot_img
spot_img

स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने निर्जन ठिकाणी नेऊन लुटण्याच्या अनेक घटना अहमदनगर जिल्ह्यात घडल्या होत्या. दरम्यान आता एक भलताच प्रकार अमोर आला आहे. नर्तिका देण्याच्या बहाण्याने एकास निर्जन ठिकाणी नेऊन लुटले आहे.

मराठवाड्यातील एका कलाकेंद्र चालकास अशा बहाण्याने लुटले आहे.तुमच्या कलाकेंद्रात संगीतबारी सादर करण्यासाठी नर्तिका देतो असे सांगत सूरज भूषणराव आंबेकर यांना राशीनजवळ निर्जन ठिकाणी नेले. तेथे त्यांना लुटले आहे. या प्रकरणी दोघांना अटक केली आहे.

सूरज भूषणराव आंबेकर (रा.लातूर हल्ली आळणी ता.जि.उस्मानाबाद) यांचा संगीत पार्टीचा व्यवसाय असून ते आळणीफाटा येथे पिंजरा सांस्कृतिक कला केंद्र येथे पार्टी चालवतात. त्यांना नर्तिका घेण्यासाठी करमाळा रोडवर बोलवले गेले. तेथे सात ते आठ जणांनी आंबेकर यांना मारहाण करून त्यांच्याकडील सोने, पैसे लुटले.

सोबत आलेल्या सचिन कापसे यांना मारहाण करून त्यांच्या हातातील अंगठी व खिशातील पाकीट काढून घेऊन त्यांना कॅनॉलमध्ये ढकलून दिले. दरम्यान या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली होती.

लेटेस्ट न्यूज़

जाहिरात