लाईफस्टाईलJio ने आणली जबरदस्त ऑफर, 198 रुपयांत मिळणार अनलिमिटेड डेटा आणि बरंच...

Jio ने आणली जबरदस्त ऑफर, 198 रुपयांत मिळणार अनलिमिटेड डेटा आणि बरंच काही

Jio Fiber 198 Plan Details: जिओने आपल्या ब्रॉडबँड पोर्टफोलिओमध्ये एक नवीन प्लॅन जोडला आहे. हा प्लॅन अशा युजर्ससाठी आहे ज्यांना कमी किंमतीत अनलिमिटेड डेटा हवा आहे. यासोबतच कंपनीने एंटरटेनमेंट अपग्रेड प्लॅनही लाँच केले आहेत. जिओच्या नव्या प्लॅनमध्ये १९८ रुपयांच्या किंमतीत अनलिमिटेड डेटा मिळतो. जाणून घेऊया त्याचा तपशील.

spot_img
spot_img

आयपीएलचा नवा हंगाम सुरू होण्यापूर्वीच जिओने नवे प्लॅन लाँच केले आहेत. टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडरने काही दिवसांपूर्वी 6 नवे प्लॅन लाँच केले होते. आता कंपनीने जिओ फायबर युजर्ससाठी नवा रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. हा प्लॅन बॅकअप ब्रॉडबँड प्लॅन हवा असलेल्या युजर्ससाठी आहे. म्हणजे ज्यांना कमी किमतीत ब्रॉडबँड प्लॅन हवा आहे.

नव्या प्लॅनमध्ये युजर्संना १० एमबीपीएस च्या स्पीडने डेटा मिळतो. मात्र युजर्स आपला प्लॅन 30Mpbs किंवा 100Mpbs स्पीडमध्ये अपग्रेड करू शकतात. युजर्स आपला प्लॅन एक, दोन किंवा सात दिवसांसाठी अपग्रेड करू शकतात. यासोबतच युजर्संना ओटीटी सब्सक्रिप्शन आणि फ्री सेट टॉप बॉक्सदेखील मिळत आहे. जाणून घेऊयात नव्या प्लॅनचा तपशील.

जियो फाइबर चा 198 रुपयांचा नवीन प्लॅन
जिओने Jio Fiber Backup Broadband Plan या नावाने हा प्लॅन लाँच केला आहे, ज्याची किंमत 198 रुपये आहे. युजर्स हा प्लॅन आगामी टाटा आयपीएल २०२३ वर पाहू शकतात. ग्राहकांना हा प्लॅन 1490 रुपयांमध्ये 5 महिन्यांसाठी खरेदी करता येणार आहे. यात 5 महिन्यांसाठी 990 रुपये चार्ज आहे, तर 500 रुपये इन्स्टॉलेशन चार्ज आहे.

प्लॅन अपग्रेड करू शकतात
या प्लॅनमध्ये युजर्संना १० एमबीपीएस च्या स्पीडने अनलिमिटेड डेटा मिळणार आहे. युजर्स याला 30 एमबीपीएस किंवा 100 एमपीबीएस स्पीडमध्ये अपग्रेड करू शकतात. 30 एमबीपीएस स्पीडचा हा प्लॅन 1 दिवस, 2 दिवस किंवा 7 दिवसांसाठी अपग्रेड केला जाऊ शकतो. यासाठी युजर्सला अनुक्रमे 21 रुपये, 31 रुपये आणि 101 रुपये खर्च करावे लागतील. 100 एमबीपीएसचा स्पीड अपग्रेड केल्यास 1 दिवसांसाठी 32 रुपये, दोन दिवसांसाठी 52 रुपये आणि 7 दिवसांसाठी 152 रुपये मोजावे लागतील.

एंटरटेनमेंट अपग्रेड प्लॅनही आहेत.
याशिवाय युजर्संना एंटरटेनमेंट अपग्रेडचा ही पर्याय मिळणार आहे. वापरकर्ते दोन पैकी एक प्लॅन निवडू शकतात. 100 रुपयांच्या मासिक शुल्कात युजर्संना 4के सेट टॉप बॉक्स, 400 लाइव्ह टीव्ही चॅनेल, 6 ओटीटी अॅप्स आणि यूट्यूब सब्सक्रिप्शन मिळेल. तर 200 रुपयांच्या मंथली प्लॅनमध्ये ग्राहकांना वरील बेनिफिट्ससह 14 ओटीटी अॅप्स आणि 550 लाईव्ह चॅनेल्सचा अॅक्सेस मिळणार आहे. कंपनीने एंटरटेनमेंट बोनान्झा प्लॅनही लाँच केले आहेत.

लेटेस्ट न्यूज़

जाहिरात