लाईफस्टाईलJio'चे टेन्शन Airtel ने वाढवले! २३९ रुपयांत दिवस-रात्र 5G डाटा फ्री'मध्ये मिळणार

Jio’चे टेन्शन Airtel ने वाढवले! २३९ रुपयांत दिवस-रात्र 5G डाटा फ्री’मध्ये मिळणार

spot_img
spot_img

भारतात 5G सेवा लाँच करण्यात आली आहे. जिओ कंपनीने देशभरात 5G सेवा ग्राहकांना देण्यास सुरुवात केली आहे. याच दरम्यान, आता जिओला जबरदस्त टक्कर देण्यासाठी देशातील टेलिकॉम क्षेत्रातील अग्रणी Airtel नेही जोरदार तयारी केली असून जिओसारखीच ऑफर आता एअरटेलनेही लाँच केली. यामुळे आता एअरटेलच्या वापरकर्त्यांना 5G सेवा वापरता येणार आहे. जिओने वेलकम ऑफर अंतर्गत जिओकडून आधीच अनलिमिटेड 5G डेटा ऑफर दिली आहे. ही ऑफर Jio Prepaid आणि Jio Postpaid ग्राहकांसाठी २३९ रुपयांमध्ये आहे.

आता Jio च्या या Jio Welcome Offer च्या तुलनेत Airtel ने अमर्यादित 5G डेटा प्लॅन (Airtel 5G Data Plan) लाँच केला आहे. भारती एअरटेलने या संदर्भात घोषणा केली.आता airtel चे वापरकर्ते अनलिमिटेड 5G डेटा वापरु शकतात. एअरटेलने 5G डेटा कॅप पूर्णपणे कमी केली आहे. एअरटेल वापरकर्ते रात्रंदिवस अनलिमिटेड जीबी डेटा वापरु शकतात. यासाठी, एअरटेल ग्राहकांना प्री-पेड आणि पोस्टपेड वापरकर्त्यांसाठी २३९ रुपये आणि त्याहून अधिकचे 4G रिचार्ज करणे अनिवार्य आहे. यापेक्षा कमी एअरटेल च्या रिचार्जवर मोफत अनलिमिटेड 5G डेटा वापरता येणार नाही.

या अगोदर Airtel एका दिवसात जास्तीत जास्त 5 जीबी डेटा देत होते. आता यात वाढ करुन अनलिमिटेड करण्यात आली आहे. ज्या वापरकर्त्यांकडे 5G मोबाईल आहेत आणि ते Airtel 5G Plus नेटवर्कवर काम करतात, ते आता अनलिमिटेड 5G डेटाचा आनंद घेऊ शकतात. Airtel 5G Plus सेवा जवळपास २७० शहरांमध्ये उपलब्ध आहे.

अनलिमिडेड 5G डेटा कसा सुरू करायचा?

Airtel ग्राहकांनी अगोदर एअरटेल थँक्स अॅप डाउनलोड करणे आवश्यक आहे. यानंतर, “अनलिमिटेड 5G डेटासाठी अॅप्लीकेशन करावे लागणार आहे. हे तुम्हाला प्रोफाइलमध्ये दिसेल. यासाठी, तुम्हाला तुमच्या क्षेत्रात 5G नेटवर्क असणे आवश्यक आहे.

लेटेस्ट न्यूज़

जाहिरात