लाईफस्टाईलMasoor Dal Face Pack: त्वचेसाठीही खूप फायदेशीर असते मसूर डाळ, अशा प्रकारे...

Masoor Dal Face Pack: त्वचेसाठीही खूप फायदेशीर असते मसूर डाळ, अशा प्रकारे वापराल तर चेहरा उजळेल

spot_img
spot_img

Masoor Dal Face Pack : बरेच लोक त्यांच्या स्किनकेअर रूटीनमध्ये डाळीचा वापर करतात. डाळ त्वचेसाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. चेहरा सुधारण्यासाठी डाळीचा वापर अनेक प्रकारे केला जाऊ शकतो. अनेक प्रकारच्या ब्युटी प्रॉडक्ट्समध्येही डाळींचा वापर केला जातो.

मसूरच्या डाळीने फेशियल केल्यास काही मिनिटांतच ग्लो येतो आणि त्वचा एकदम मुलायम होते. हा एक नैसर्गिक मार्ग आहे. अशावेळी जर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर झटपट ग्लो आणायचा असेल तर तुम्ही फेशियल म्हणून मसूरच्या डाळीचा वापर करू शकता.

तर जाणून घेऊयात मसूर डाळीने सौंदर्य कसे वाढवावे याविषयी –
मसूर डाळ चेहरा स्वच्छ करण्याचे काम करते. त्यासाठी एका बाऊलमध्ये डाळ घेऊन त्यात गरजेनुसार कच्चे दूध घालावे. आता हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा. आपण डाळीपासून घरगुती मॉइश्चरायझर देखील बनवू शकता. त्यासाठी एक चमचा डाळ घेऊन त्यात अर्धा चमचा हळद आणि गुलाबजल घालावे. त्याची गुळगुळीत पेस्ट तयार करून चेहऱ्यावर लावा आणि १० मिनिटे ठेवा. त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा. असे केल्याने त्वचेला मॉइश्चरायझिंग आणि स्वच्छ एकाच वेळी केले जाते.

आपण डाळीने बनवलेलं सर्वोत्तम स्क्रब वापरुन पाहू शकता. त्यासाठी 2 चमचे वाटलेली डाळ घेऊन त्यात एक चमचा कच्चे दूध आणि एक चमचा वाटलेले ओट्स घालावे. आता हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि हलक्या हातांनी स्क्रब करा आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवा.

लेटेस्ट न्यूज़

जाहिरात