Nashik Padvidhar Election Result : मागील काही दिवसांपासून नाशिक पदवीधर मध्ये ज्या घडामोडी झाल्या त्या महाराष्ट्रभर चर्चेचा विषय झाला होता. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत काँग्रेसचे सत्यजित तांबे यांनी अपक्ष फॉर्म भरला. अन त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीने शुभांगी पाटील याना उमेदवारी दिली.
आता या निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. त्यादृष्टीने सध्या मतमोजणी सुरु आहे. दरम्यान पहिल्या फेरीमध्ये सत्यजित तांबे हे आघाडीवर आहेत. शुभांगी पाटील या त्यांच्यापेक्षा मागे आहेत. दरम्यान अनेक ठिकाणी सत्यजित तांबे यांच्या विजयाचे बॅनर लावले आहेत.
ही मतमोजणी सय्यद पिंप्री येथील गोदामात २८ टेबलवर सुरू आहे. आता या पहिल्या फेरीमध्ये सत्यजित तांबे आघाडीवर असल्याचे समोर आले आहे. आता या निवडणुकीत कोण विजयी होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील या दोघांच्या समर्थकांकडून विजयाचा दावा केला जात आहे.