ताज्या बातम्याब्रेकिंग : सत्यजित तांबे यांचा दणदणीत विजय, पहा कुणाला किती मते

ब्रेकिंग : सत्यजित तांबे यांचा दणदणीत विजय, पहा कुणाला किती मते

spot_img
spot_img

Nashik Padvidhar Nivadnuk Result: मागील काही दिवसांपासून नाशिक पदवीधर मध्ये ज्या घडामोडी झाल्या त्या महाराष्ट्रभर चर्चेचा विषय झाला होता. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत काँग्रेसचे सत्यजित तांबे यांनी अपक्ष फॉर्म भरला. अन त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीने शुभांगी पाटील यांना उमेदवारी दिली. आता या निवडणुकीचा निकाल आज लागला लागला आहे. सत्यजित तांबे यांचा दणदणीत विजय झाला आहे.

वैयक्तिक जनसंपर्क, वडलांची सलग तीनदा आमदारकी आणि निवडणुकीच्या सूक्ष्म नियोजनामुळे नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजित तांबे यांचा दणदणीत विजय झाला आहे. या निवडणुकीत सत्यजित तांबे यांना 68999 इतकी मते मिळाली तर शुभांगी पाटील यांना तब्बल 39534 इतकी मते मिळाली. नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूकीच्या मतमोजणीस आज सकाळी आठ वाजेपासून सुरूवात झाली होती.

नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी नाशिक विभागात ४९.३२ टक्के मतदान झाले होते. दरम्यान ही मतमोजणी सय्यद पिंप्री येथील गोदामात २८ टेबलवर सुरू होती. आता या मतमोजणीनंतर निकालसमोर आला असून सत्यजित तांबे यांचा दणदणीत विजय झाल्याचे समोर आले आहे.

त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. आता या निकालानंतर पुन्हा एकदा सत्यजित तांबे यांच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे. कारण ते अपक्ष निवडून आले आहेत. भाजपने त्यांना पाठिंबा दिला होता. आता ते कोणता निर्णय घेणार, भाजपमध्ये जाणार की वेगळा काही निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

लेटेस्ट न्यूज़

जाहिरात