BYD Seal EV Price: टाटा मोटर्स Tata Motors ही देशातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक वाहन विकणारी कंपनी आहे. याशिवाय ह्युंदाई Hyundai आणि कियासह Kia अनेक ब्रँड या इलेक्ट्रिक वाहनांच्या सेगमेंटमध्ये आपली स्तिथी मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत. चीनची इलेक्ट्रिक वाहन कंपनी बिल्ड योर ड्रीम्स build your dreams (बीवायडी) भारतात दाखल झाली आहे. कंपनी सध्या दोन कारची विक्री करत आहे. तसेच नुकत्याच पार पडलेल्या 2023 ऑटो एक्स्पोमध्ये Auto Expo कंपनीने आपली सील इलेक्ट्रिक सेडान (बीवायडी सील ईव्ही) सादर केली. विशेष म्हणजे ही कार ७०० किमी, ५२२ एचपी पॉवर आणि ६७० एनएम टॉर्कसह येते.
कधी लाँच होणार?
२०२३ च्या चौथ्या तिमाहीत भारतात आणण्याची कंपनीची योजना असल्याचे आश्वासन कंपनीने दिले होते आणि असे दिसते की गोष्टी मार्गी लागल्या आहेत. कंपनीने बीवायडी सीलला भारतातील आपल्या अधिकृत वेबसाइटवर दाखवले आहे. ही कार अवघ्या ३.८ सेकंदात ० ते १०० किमी प्रतितास वेग पकडू शकते. भारतात ही कार ह्युंदाई आयनिक 5 hyundai ioniq 5 आणि किया ईव्ही 6 Kia ev6 सारख्या कारशी स्पर्धा करू शकते.

६१.४ किलोवॅट आणि ८२.५ किलोवॅट या दोन बॅटरी साईजमध्ये ही कार सादर केली जाण्याची शक्यता आहे. छोट्या बॅटरीमध्ये २०४ एचपी देणारा सिंगल मोटर सेटअप मिळेल. याची रेंज ५५० किमी असेल. तर मोठी बॅटरी ७०० किमीपर्यंत रेंज देणार आहे. यात बीवायडीचे ब्लेड बॅटरी तंत्रज्ञान असेल, ज्यामुळे बॅटरीला आग लागण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी होते. याव्यतिरिक्त, ब्लेड बॅटरी तंत्रज्ञानाची वास्तविक श्रेणी दावा केलेल्या श्रेणीच्या अगदी जवळ आहे.
किंमत काय असणार
‘माऊंट एव्हरेस्ट’ नेल पेनिट्रेशन टेस्ट पास करणारी ही एकमेव ईव्ही बॅटरी असल्याचा दावा केला जात आहे. बीवायडीने किंमतीचा अंदाज जाहीर केलेला नाही. लाइन-अपमध्ये बीवायडी अॅटो 3 पेक्षा महाग राहणार आहे. ही कार ज्या कारला टक्कर देणार आहे, त्यांची किंमत ४५ ते ६० लाख रुपयांच्या दरम्यान आहे.