खरवंडी कासार प्रतिनिधी/महादेव बटुळे :
भगवान गडाच्या पायथ्याशी असलेला भगवानगड तांडा या ठिकाणी आरती नवनाथ चव्हाण वय वर्ष १९ या मुलीला विवाह झाल्यानंतर अचानक दोन वर्षांनी जीबीएस या दुर्मिळ आजाराने ग्रस्त झाली. आरतीच्या घरच्यांनी खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. परंतु घरची परिस्थिती बिकट असल्यामुळे व खर्च जास्त लागत असल्यामुळे तिला पैसे नसल्यामुळे माघारी परतावे लागले.
आरतीचे आई वडील ऊसतोड मजूर आहेत . ही माहिती भालगाव गटातील डॉ. मनोरामा खेडकर यांना समजतात त्यांचे पती प्रदूषण आयुक्त दिलीप खेडकर हे या कुटुंबाच्या घरी जाऊन तात्काळ दहा हजाराची मदत केली. आता तिच्यावर परिवर्तन प्रतिष्ठान तर्फे तिच्यावर उपचार केले जाणार आहेत. त्यामुळे या निराधार ला आधार दिल्यामुळे भगवानगड परिसरातून दिलीप खेडकर साहेब, मनोरमा खेडकर व माणिक मामा खेडकर यांचे भगवानगड परिसरातून आभार व्यक्त होत आहेत
डॉ .मनोरमा खेडकर यांनी परिसरातील दोन मुलींना शिक्षणासाठी दत्तक घेतले आहे, परिसरात गरजूंना ते धावून येत आहेत व आश्वासन न देता तात्काळ मदत करत आहेत. जनतेमधून त्यांचे आभार व्यक्त होत आहेत.