ताज्या बातम्यापुणे शहरात तीन वर्षांतील नीचांकी तापमानाची नोंद

पुणे शहरात तीन वर्षांतील नीचांकी तापमानाची नोंद

spot_img
spot_img

पुणे : थंडीचा कडाका राज्यातील काही भागांत चांगलाच जाणवू लागला आहे. पुणे शहरात चार-पाच दिवसांपासून चांगलाच गारठा (coldest Pune) जाणवत आहे. त्यात पहाटे अन् रात्री थंडी, तर दिवसा अंगाची लाही लाही करणारे ऊन जाणवत होते. परंतु आता त्यात बदल झाला आहे.

बुधवारी गेल्या तीन वर्षातील सर्वात नीचांकी तापमानाची (temperature) नोंद झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात गेल्या तीन वर्षात प्रथमच तापमान 8.4 अंश सेल्सिअसवर आलंय. दुसरीकडे मुंबईतील तापमानात मात्र वाढ झाली आहे. मुंबईकरांना फेब्रुवारी महिन्यातच एप्रिलचा कडाका जाणवत आहे.

मागील वर्षी फेब्रवारी महिन्यात पुणे शहराचे तापमान 9.9 अश सेल्सिअसवर आले आहेत. 2021 मध्ये 8.6 अंश सेल्सिअस होते. तर 2020 मध्ये 10.1 अंश सेल्सिअस तापमान आले होते. आता शुक्रवारपासून पुणे शहरातील तापमान वाढण्यास सुरुवात होणार असल्याचे पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजात म्हटलंय. आठवड्याअखेर तापमान 12 ते 13 अंश सेल्सिअसपर्यंत जाणार आहे.

लेटेस्ट न्यूज़

जाहिरात