लाईफस्टाईलReliance Jio चा धमाका , औरंगाबाद - नाशिकसह या शहरांमध्ये 5G सेवा...

Reliance Jio चा धमाका , औरंगाबाद – नाशिकसह या शहरांमध्ये 5G सेवा सुरू

spot_img
spot_img

नवी दिल्ली : येत्या काही दिवसांत देशात सर्वत्र 5G चा वापर केला जाणार आहे. रिलायन्स जिओने देशातील अनेक शहरांमध्ये 5G सेवा सुरू केली असून आता या यादीत 11 नवीन शहरांचाही समावेश करण्यात आला आहे.

यामध्ये महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, केरळ आणि चंदीगडमधील शहरांचा समावेश आहे. रिलायन्स जिओच्या म्हणण्यानुसार, 11 शहरांमध्ये 5 जी सेवा सुरू करण्यात आली आहे. यामध्ये लखनौ, त्रिवेंद्रम, म्हैसूर, नाशिक, औरंगाबाद आणि चंदीगड चा समावेश आहे.

मोहाली, पंचकुला, जीरकपूर, खरड आणि डेराबस्सी येथेही 5 जी सेवा सुरू करण्यात आली आहे. देशात पहिल्यांदाच एकाच वेळी अनेक राज्यांमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने 5 जी सेवा सुरू करण्यात आली आहे.

Jio Welcome Offer मिळणार
पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, या सर्व शहरांमध्ये जिओच्या 5 जी सेवेचा पर्याय निवडणाऱ्या ग्राहकांना जिओ वेलकम ऑफर मिळणार आहे. या ऑफरअंतर्गत सर्व ग्राहकांना १ जीबीपीएसपर्यंत हाय स्पीडवर अनलिमिटेड डेटाचा आनंद घेता येणार आहे. कंपनीच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही सर्व शहरे देशातील प्रमुख पर्यटन स्थळे आणि शैक्षणिक केंद्रे आहेत. त्यामुळे पर्यटक आणि विद्यार्थ्यांना हायस्पीड ५जी सेवेचा लाभ मिळणार आहे.

‘एज्युकेशन फॉर ऑल’सह सेवा लाँच
गुजरातमधील सर्व ३३ जिल्ह्यांमध्ये १०० टक्के ५जी सेवा सुरू करताना कंपनीने सांगितले होते की, ग्राहकांना कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय ५ जी सेवा दिली जाईल. त्याचबरोबर कंपनीने राज्यात ‘एज्युकेशन फॉर ऑल’ हा उपक्रमही सुरू केला आहे. या योजनेअंतर्गत रिलायन्स फाऊंडेशन आणि जिओ हे गुजरातमधील १०० शाळांचे विलीनीकरण करणार आहेत.

लेटेस्ट न्यूज़

जाहिरात