लाईफस्टाईलSamsung ची जबरदस्त ऑफर, अर्ध्या किमतीत मिळतोय Galaxy S23 Ultra स्मार्टफोन!

Samsung ची जबरदस्त ऑफर, अर्ध्या किमतीत मिळतोय Galaxy S23 Ultra स्मार्टफोन!

सॅमसंगचा फ्लॅगशिप स्मार्टफोन तुम्हाला कमीत कमी किमतीत खरेदी करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे.

spot_img
spot_img

Samsung चा हा फ्लॅगशिप स्मार्टफोन तुम्हाला सर्वात कमी किंमतीत खरेदी करण्यासाठी उपलब्ध झाला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला लाँच झालेल्या Samsung Galaxy s23 सीरिजवर कंपनीकडून मोठी सूट मिळत आहे. या सीरिजमध्ये कंपनीचे तीन स्मार्टफोन्स आहेत. यामध्ये Galaxy s23, s23 Plus आणि s23 Ultra चा समावेश आहे. या फोनवर जबरदस्त ऑफर्स आहेत.

स्मार्टफोनमध्ये नो-कॉस्ट ईएमआय (Samsung Galaxy s23 No Coast EMI), एक्सचेंज बोनस (exchange bonus) आणि इतर काही फायदे मिळू शकतात. या बोनस ऑफरमध्ये ग्राहकांना 18,000 रुपयांपर्यंत बेनिफिट्स मिळू शकतात. या सर्व ऑफर्सचा फायदा घेत तुम्ही गॅलेक्सी एस २३ अल्ट्रा फोन Samsung Galaxy s23 Ultra Phone ५९ हजारात खरेदी करू शकता.

Samsung Galaxy S23 सीरिजवर ऑफर कोणत्या?
Samsung च्या Galaxy s23 आणि s23 Plus ला 13,000 रुपयांचा नफा मिळू शकतो. तसेच १२ महिन्यांच्या नो-कॉस्ट ईएमआयचा ही पर्याय आहे. हा फोन तुम्ही 24 महिन्यांच्या नो-कॉस्ट ईएमआयवर खरेदी करू शकता. ज्याचा सरासरी ईएमआय तुम्हाला 3,124 रुपये असा असेल. याशिवाय ग्राहकांना 8,000 रुपयांचा अपग्रेड बोनस दिला जात आहे.

गॅलेक्सी एस २३ हा फोन कंपनीने ७४,९ रुपयांना लाँच केला होता. यात ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज आहे. तर 8 जीबी + 256 जीबी स्टोरेज व्हेरियंटची किंमत 79,999 रुपये आहे. हा फोन चार रंगांमध्ये उपलब्ध आहे. यात फॅंटम ब्लॅक, लॅव्हेंडर, ग्रीन आणि क्रीम रंगांचा समावेश आहे.

गॅलेक्सी एस 23 प्लसबद्दल बोलायचे झाले तर कंपनीने हा फोन 94,999 रुपयांमध्ये लाँच केला होता. ही फोनच्या 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज व्हेरियंटची किंमत आहे. तर 512 जीबी स्टोरेज व्हेरियंटची किंमत 1,04,999 रुपये आहे. फोन फँटम ब्लॅक आणि क्रीम कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे.

Samsung Galaxy Ultra वर बंपर ऑफर
गॅलेक्सी एस २३ अल्ट्रा ला जवळपास ५९,९ रुपयांना खरेदी करता येईल. सॅमसंगचा हा फोन १८००० रुपयांचा पर्याय आणि १२ महिन्यांसाठी नो-कॉस्ट ईएमआयसह उपलब्ध आहे. 10,000 रुपयांचा अतिरिक्त अपग्रेड बोनस देखील दिला जात आहे.

लेटेस्ट न्यूज़

जाहिरात