Nashik Padvidhar Election Result 2023 : आज सर्वत्र नाशिक पदवीधर मतदारसंघ मतमोजणीची धूम आहे. सर्वांच्याच नजारा या निकालाकडे लागलेल्या आहेत. परंतु या निकालाच्या आधीच काही घडामोडींनी वेग घेतला आहे. त्यातील महत्वाचे म्हणजे या निवडणुकीस सुरवात झाल्यापासून तांबे पिता पुत्रांनी धक्कातंत्र वापरल्याचे बोलले जात आहे.
आज निकाल असताना कालपासून सत्यजित तांबे Satyajeet Tambe गायब असल्याचे समोर येत आहे. मतमोजणीच्या दिवशी या घडामोडींची पुन्हा एकदा विविध चर्चाना उधाण आले आहे. दरम्यान या संदर्भात कार्यकर्त्यांकडे चौकशी केली असता ते अज्ञात स्थळी गेल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान ते अगदी मतमोजणीच्या वेळीस अमोर येतील असेही सांगण्यात येत आहे.
निकाल येण्याच्या आधीच सत्यजित तांबे यांच्या विजयाची चर्चा जोर धरू लागली आहे. काह भागांत सत्यजित तांबे यांना शुभेच्छा देणारे बॅनर्स नाशिकमध्ये झळकले आहेत. परंतु हे सर्व असताना सत्यजित तांबे अचानक गायब का झाले ? या प्रश्नाची चर्चा सध्या सुरु आहे. दरम्यान सत्यजित तांबे यांच्याशी संपर्क होऊ न शकल्याने याबाबत खात्रीशील वृत्त देता येत नाही.
विशेष म्हणजे डॉ. सुधीर तांबे Dr Sudhir Tambe हे काँग्रेसचे तीन टर्मचे आमदार होते. त्यामुळे काँग्रेसने यावेळीही मविआकडून सुधीर तांबे यांना तिकिट देण्याचा निर्णय घेतला गेला. मग असे असताना अचानक नाशिक पदवीधर मतदार संघात तांबे पिता-पुत्रांनी जे धक्का तंत्र वापरले त्यामागे काय कारण असावे याचीच चर्चा सध्या जोर धरू लागली आहे.
या घडामोडी घडत आहेत यामध्ये डॉ. सुधीर तांबे यांना त्यांच्या भूमिकेविषयी अनेकांनी विचारले असता योग्य वेळ आल्यावर आम्ही भूमिका स्पष्ट करू, अशीच अगम्य प्रतिक्रिया तांबे यांनी दिली होती.