सर्वांच्याच नजरा नाशिक पदवीधर मतदारसंघ निकालाकडे लागल्या आहेत. दरम्यान मतमोजणी केंद्रावरून एक बातमी आली आहे. तेथे काही गोंधळ झाल्याचे वृत्त आले आहे. तेथे प्रतिनिधींची संख्या अधिक झाल्याने गोंधळ झाला असल्याचे समोर आले आहे.
सकाळी देखील या ठिकाणी थोडासा गोंधळ झाला होता. असाच गोंधळ पुन्हा एकदा झाला आहे. शुभांगी पाटील यांच्या प्रतिनिधींची संख्या जास्त झाली. त्यानंतर गोंधळ झाला असे वृत्त आले आहे. दरम्यान पोलिसांनी व्यवस्थित सगळे हाताळले आहे. आणि त्वरित परिस्थिती सर्वसामान्य केली आहे.
सध्या सुरु असणाऱ्या मतमोजणीनुसार सत्यजित तांबे हे 15784 मतांसह आघाडीवर आहेत. शुभांगी पाटील यांना ७८६२ मते आहेत. सध्या तरी सत्यजित तांबे आघाडीवर असल्याचेच दिसत आहे. अनेक ठिकाणी सत्यजित तांबे यांचे विजयाचे बॅनर लावलेले आहेत.