सर्वांच्याच नजरा नाशिक पदवीधर मतदारसंघ निकालाकडे लागून आहे. सत्यजित तांबे हे 15784 मतांसह आघाडीवर आहेत. दरम्यान या निकालाच्या आधीच काही घडामोडींनी वेग घेतला आहे. या निवडणुकीस सुरवात झाल्यापासून तांबे पिता पुत्रांनी धक्कातंत्र वापरल्याचे बोलले जात आहे.
आता विरोधी पक्षनेते अजित दादांनी एक वक्तव्य केले आहे. त्यानंतर पुन्हा एकदा राजकीय चर्चाना उधाण आहे. एका मीडियाशी बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले आहेत की, नाशिक पदवीधर मध्ये सत्यजित तांबे यांचाच विजय होईल. तसेच सत्यजित हे सुज्ञ आहेत. काँग्रेसच्या निर्णयावर बोलण्या इतका मी मोठा नाही. परंतु त्यांना तिकीट दिल असत तर ही वेळ आली नसती.
त्यांचे युवा नेता म्हणून कार्य मोठे आहे. ते सुज्ञ आहेत. ते आता योग्य निर्णय घेतील याची मला खात्री आहे असे वक्तव्य अजित दादांनी केले आहे. दरम्यान त्यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर मात्र विविध खुमासदार चर्चा सुरु झाल्या. सत्यजित तांबे आता राष्ट्रवादीत येणार का? अशीही चर्चा खासगीत होऊ लागली आहे.
सध्या मतमोजणी पाहता सत्यजित तांबे याना १५७८४ मते आहेत तर शुभांगी पाटील यांना ७८६२ मते आहेत. सध्या तरी सत्यजित तांबे आघाडीवर असल्याचेच दिसत आहे. अनेक ठिकाणी सत्यजित तांबे यांचे विजयाचे बॅनर लावलेले आहेत.