लाईफस्टाईलडब्बा टीव्हीला करा बाय बाय: TCL ने लॉन्च केले 3 Smart TV,...

डब्बा टीव्हीला करा बाय बाय: TCL ने लॉन्च केले 3 Smart TV, किंमत फक्त 13,490 पासून सुरु

TCL 32 इंच Full HD Smart TV ची किंमत भारतात १३,४९० रुपयांपासून सुरू होते. चला आपण जाणून घेऊयात नवीन टीसीएल टीव्हीबद्दल…

spot_img
spot_img

TCL 32 inch HD FHD Smart TVs launched: TCL: गेल्या काही वर्षांत भारतातील टीव्ही व्यवसायात झपाट्याने वाढ झाली आहे. आता टीसीएलने बाजारात तीन बजेट रेंजचे स्मार्ट टीव्ही लाँच केले आहेत. टीसीएलच्या नवीन टीव्हीमध्ये TCL S5400, S5400A आणि S5403A यांचा समावेश आहे. हे सर्व बेजल-लेस डिझाइन्स आहेत. या स्मार्ट टीव्हीमध्ये डॉल्बी ऑडिओ सपोर्टसह 24W स्पीकर्स देण्यात आले आहेत. या टीव्हीमध्ये १६ जीबीपर्यंत स्टोरेज आणि अँड्रॉइड टीव्ही इंटरफेस आहे.

TCL 32″ HD, FHD Smart TVs Price
टीसीएल ३२ इंचाचा S5400 स्मार्ट टीव्ही भारतात १५,९९० रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे. तर 32 इंचाचा S5400A 13,490 रुपयांना लाँच करण्यात आला आहे. फुल एचडी टेलिव्हिजनची विक्री देशात अॅमेझॉन इंडिया, फ्लिपकार्ट, ऑफलाइन रिटेल आणि ब्रँड स्टोअर्सवर विक्रीसाठी उपलब्ध असेल.

तर 32 इंचाचा S5400A एचडी टीव्ही देशभरातील ऑफलाइन रिटेल आणि ब्रँड स्टोअर्समधून 13,990 रुपयांना खरेदी करता येईल. हे टीव्ही १० टक्के इन्स्टंट डिस्काउंटसह घेण्याची संधी आहे.

TCL 32″ HD, FHD Smart TVs Features
S5403A HD TV टीव्हीमध्ये S5400A सारखेच स्पेसिफिकेशन्स आहेत. सर्वप्रथम S5400 बद्दल बोलूया – या टीव्हीमध्ये 32 इंचाची फुल एचडीडी स्क्रीन आहे जी HDR 10 ला सपोर्ट करते. कंपनीचे म्हणणे आहे की, या टीव्हीला लेटेस्ट Google TV इंटरफेस मिळतो, म्हणजेच तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरून स्मार्ट टीव्हीला सपोर्ट करणारे अ ॅप्स डाऊनलोड करू शकता. या टीव्हीला Google Watchlist मध्ये प्रवेश मिळतो जिथे वापरकर्ते ओटीटी अॅप्समधून आपला आवडता कंटेंट पाहू शकतात. म्हणजे तुम्हाला नंतर बघायचे असलेले शो किंवा सिनेमे तुम्ही सहज ट्रॅक करू शकता.

याशिवाय टीव्हीमध्ये बिल्ट-इन क्रोमकास्ट फीचर आहे म्हणजेच युजर्स कोणत्याही डिव्हाइसवरून टीव्हीवर म्युझिक, व्हिडिओ आणि अॅप्स कास्ट करू शकतात. त्याचबरोबर मुलांना फिल्टर केलेला सुरक्षित कंटेंट पाहता यावा यासाठी टीव्हीमध्ये गुगल किड्स मोडचा अॅक्सेसही उपलब्ध आहे.

टीसीएल एस ५४००ए/एस५४००ए मध्ये ३२ इंचाची एचडी रेडी स्क्रीन आहे जी एचडीआर १० ला सपोर्ट करते. या टीव्हीला लेटेस्ट अँड्रॉइड टीव्ही ११ ऑपरेटिंग सिस्टीम देण्यात आली असून ग्राहकांना ७० हून अधिक अॅप्स, ७,००,००० हून अधिक चित्रपट आणि शोजचा अॅक्सेस मिळतो. दोन्ही टीव्ही मॉडेल्स मायक्रो-डिमिंग तंत्रज्ञानासह येतात जे 2304 सेक्रेट झोनमध्ये टीव्ही सामग्री विश्लेषणाच्या आधारे स्क्रीनची चमक आणि अंधार समायोजित करते. या टीव्हीमध्ये ब्लूटूथ ५.०, वाय-फाय, दोन एचडीएमआय आणि यूएसबी २.० कनेक्टिव्हिटी फीचर्स देण्यात आले आहेत.

लेटेस्ट न्यूज़

जाहिरात