नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) तरुणांसाठी नोकरीची नवी संधी जाहीर केली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने ऑफिसर ते क्लार्क पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार स्टेट बँक ऑफ इंडियाच्या sbi.co.in अधिकृत संकेतस्थळावर जाऊन या पदांसाठी अर्ज करू शकतात या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2023 आहे.
याशिवाय https://recruitment.bank.sbi/crpd-2022-23-rs-29/apply लिंकद्वारे उमेदवार या पदांसाठी थेट अर्ज करू शकतात. तसेच एसबीआय रिक्रूटमेंट 2022 नोटिफिकेशन पीडीएफ या लिंकवर क्लिक करून तुम्ही अधिकृत नोटिफिकेशन देखील पाहू शकता. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण १४३८ पदे भरण्यात येणार आहेत.
भरतीसाठी महत्त्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सुरू झालेली तारीख – 22 डिसेंबर
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 जानेवारी
एकूण जागा किती?
एकूण पदे – 1438
या पदांसाठी पात्रता
अधिकृत अधिसूचनेत नमूद केल्याप्रमाणे उमेदवारांकडे संबंधित पात्रता असणे आवश्यक आहे.
किती असेल पगार ?
– क्लार्क – 25000 रुपये
– जेएमजीएस-I- 35000 रुपये
– MMGS-II आणि MMGS-III – 40000 रुपये
निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखतीवर आधारित असेल.