Shivsena Party Symbol | राज्याचा राजकारणात मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. कारण, केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण एकनाथ शिंदेंना दिलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा झटका बसला आहे. शिवसेना कुणाची याचा निर्णय अखेर झाला. केंद्रीय निवडणूक आयोगाने अखेर आपला निर्णय जाहीर केला. उद्धव ठाकरे यांना मोठा झटका बसला आहे. शिवसेना नाव आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना मिळाला आहे.
या निर्णयामुळे उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंच्या हातून शिवसेना गेली आहे आणि त्यामुळे संपूर्ण राजकारणात खळबळ उडाली आहे.केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आणणारा फैसला अखेर सुनावला. निवडणूक आयोगातील कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष असताना केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिलं. निवडणूक आयोगाने शुक्रवारी सायंकाळी हा निर्णय दिला. निवडणूक आयोगाचा निर्णय हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का असून, आता ठाकरे काय भूमिका घेणार? सर्वोच्च न्यायालयात दार ठोठावणार का? हे पाहावं लागेल.
निवडणूक आयोगाचा 78 पानांचा निकाल
निवडणूक आयोगाने 78 पानांचा निकाल दिला आहे, या निकालात शिवसेनेचा इतिहासच बदलला गेला आहे. ठाकरे आणि शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाला मोठ्या प्रमाणावर प्रतिज्ञापत्र देण्यात आली होती, पण निवडणूक आयोगाच्या निकालात आमदार आणि खासदार कुणाकडे हाच कळीचा मुद्दा ठरला. एकनाथ शिंदे यांच्यासोबत 55 पैकी 40 आमदार आणि 13 खासदार गेले, याशिवाय प्रतिनिधीसभेतही बहुमत आपल्या बाजूने आहे, असा दावा शिंदेंकडून निवडणूक आयोगाकडे करण्यात आला होता.