लाईफस्टाईलSmart Tires : ऑटो इंड्रस्टीही होतेय आता 'स्मार्ट', अब की बार ‘स्मार्ट’...

Smart Tires : ऑटो इंड्रस्टीही होतेय आता ‘स्मार्ट’, अब की बार ‘स्मार्ट’ टायर्स…

spot_img
spot_img

Smart Tires : स्मार्टफोन, स्मार्टवॉच हे शब्द तुम्ही आधी ऐकले असतील. पण तुम्ही कधी स्मार्ट टायरबद्दल ऐकलं आहे का? वाहन कंपन्या वाहनांच्या इंजिनपासून ते त्या फीचर्सपर्यंत सर्व काही स्मार्ट करत आहेत. स्मार्ट फीचर्समुळे कार चालवणे सोपे होते. पण आता टायर कंपन्याही मागे नाहीत. जेके टायर्स चं नाव तुम्ही ऐकलं असेलच. कंपनीची उपकंपनी ट्रीलनं आता स्मार्ट टायर बाजारात आणले आहेत. ते प्रामुख्याने इलेक्ट्रिक वाहनांसाठी डिझाइन केलेले आहेत. यामुळे तुमच्या ईव्हीची रेंजही वाढेल.

जे लोक आपल्या कारमध्ये या कंपन्यांचे टायर वापरत आहेत त्यांना हे स्मार्ट टायर मिळू शकतात. याची किंमत तीन हजार रुपये असेल. या स्मार्ट टायर्सवर सेन्सर बसवण्यात आले आहेत. तापमान किंवा दाब वाढल्यास किंवा पंक्चर झाल्यास या सेन्सर्सच्या मदतीने चालकाच्या मोबाइलवर अलर्ट पाठवले जातील. ईव्ही ग्राहकांसाठी बनवलेल्या रेंजर एचपी टायर्ससाठी ओईएमशीही चर्चा सुरू आहे. कठोर पृष्ठभागांना तोंड देण्यासाठी डिझाइन केलेले रेंजर X-AT हे एसयूव्हीसाठी डिझाइन केले गेले आहे. टायर उत्पादक वेगवेगळ्या प्रकारच्या वाहनांसाठी टायर तयार करत आहेत.


सध्या वाहन क्षेत्रामध्ये बारूच प्रगती होत आहे. नवनवीन टेक्नॉलॉजीमुळे यात भर पडत आहे. आता अशा पद्धतीच्या इलेक्ट्रिक टायरमुळे मोठी प्रगती होण्याची शक्यता वाढली आहे.

लेटेस्ट न्यूज़

जाहिरात